News 34 chandrapur
चंद्रपूर - भद्रावती तालुक्यातील गवराळा येथील शेतशिवरात निवस्त्र अवस्थेत अनोळख्या युवतीचे मुडकं नसलेले मृतदेह आढळुन आले. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत. सखोल चौकशी करुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शाखेच्या वतीने करण्यात आली असुन त्यांच्या वतीने सदर मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना देण्यात आले आहे. Young chanda brigade
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, सविता दंडारे, वैशाली मेश्राम, नंदा पंधरे, निलिमा वनकर आदिंची उपस्थिती होती. (The naked body of a young woman)
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्या अंतर्गत येणा-र्या गवराळा या परीसरातील बिसेन ढेंगळे यांच्या (headless body) शेतशिवरात निवस्त्र अवस्थेत अनोळख्या युवतीचा मुडकं नसलेला मृतदेह आढळुन आला होता. हे मृतदेह अतिशय गंभिर अवस्थेत आढळुन आल्याने या घटनेवरून अतिशय कृर घटना मुली सोबत घडल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे भद्रावतीसह संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागात या घटनेचे पडसाद उमटत आहे. असे असले तरी मृत मुलीची ओळख पटविण्यात अद्यापतरी पोलिस प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे या गंभीर घटनेची तात्काळ चौकशी करूण संबंधीत आरोपींना अटक करत आरोपी नराधमाना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना करण्यात आली आहे.