News34 chandrapur
भद्रावती - 4 एप्रिलला भद्रावती येथील सुमठाणा तेलवासा रस्त्यावर स्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसमोर एका युवतीचे निर्वस्त्र अवस्थेत शीर नसलेला मृतदेह आढळला होता.
घटनेला 2 दिवसाचा कालावधी लोटूनही गेला तरी त्या युवतीची ओळख मात्र पटली नाही. (Challenge to the police)
चंद्रपूर पोलिसांनी याबाबत शोध पत्रक जारी करीत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत युवती बेपत्ता असल्याची तक्रार असल्यास सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र त्यानंतरही या प्रकारे जिल्ह्यात युवती बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाली नाही. (the naked body of a young woman)
यावरून सदर युवती ही दुसऱ्या जिल्ह्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदर युवतीचे शीर शोधण्यात पोलिसांना अपयश आले, त्यामुळे सदर अनोळखी युवतीचे शीर इतर ठिकाणी विल्हेवाट लावण्याकरिता नेले असेल अशी दाट शक्यता आहे. Crime news
घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासणे सुरू केले आहे.
मोबाईल नेटवर्क ही घटनेच्या दिवशीचे ट्रेस करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. (Mobile network)
युवतीचे शीर नसलेले निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. (talking heads psycho killer)
युवतीच्या नृशंस हत्येप्रकरणातील आरोपीना अटक करून कठोर कारवाई करावी यासाठी सामाजिक संघटनांनी कॅडलं मार्च (candle march) काढून त्या नृशंस हत्येचा निषेध केला आहे. psycho killer
पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगात असून लवकरच या प्रकरणातील विकृत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडणार असा अंदाज नागरिक व्यक्त करीत आहे.