News 34 chandrapur
मूल : कार आणि मोटर सायकलच्या झालेल्या अपघातामध्ये दोन जन जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी ५ वा. चे दरम्यान मूल नागपूर राज्यमार्गावर घडली. Accident होंडा शाईन (MH-34-BU-0584) ने धमेंद्र कृष्णाजी पराते रा. नवरगांव आणि विनोद भास्कर बोरकर रा. गिरगांव मूल वरून नवरगांव कडे जात होते. दरम्यान सिंदेवाही वरून मूलच्या दिशेने आँल्टो कार (MH-33-A-1383) येत असतांना मूल पासुन ५ कि.मी.अंतरावर असलेल्या चितेगांव समोर दोन्ही वाहणांची समोरा समोर धडक झाली.अपघाताचे वेळेस आँल्टो कार रस्त्याच्या डाव्या बाजुने येत असतांना दुचाकी स्वारांनी विरूध्द आणि भरधाव वाहन चालविल्याने सदर अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. Car bike accident
अपघातामध्ये धमेंद्र पराते आणि विनोद बोरकर यांना गंभीर दुखापत झाल्याने दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर स्थानिक उपजिल्हा रूग्णालयामधुन चंद्रपूरला हलविण्यात आले.
