News 34 chandrapur
मूल (गुरू गुरनुले)
     विशेष सुधारणा निधी अंतर्गत करण्यात येत असलेल्या ७ कोटी रूपये खर्चाच्या शहरातील रस्ते बांधकामात कंञाटदार शासकीय नियम धाब्यावर बसवुन काम करीत असल्याने संबंधित कामाची चौकशी करून कार्यवाही करावी. अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक युवकांनी जिल्हा महासचिव तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार ह्यांचे नेतृत्वात केली आहे. Inquiry demand
 
     सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता प्रशांत वसुले ह्यांना दिलेल्या निवेदनात काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी शासनाच्या विशेष सुधारणा निधी अंतर्गत शहरातील प्रभाग क्रं. ७ आणि ८ मध्ये रस्ते आणि नालीचे बांधकाम करण्यासाठी ७ कोटी रूपये प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या ७ कोटी रूपयांमधुन नियोजित रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम व्यवस्थित, नियमानुसार आणि आवश्यक व उत्तम साहीत्य वापरून होणे अपेक्षित आहे. परंतु सदर कामाचे कंञाटदार डि.व्ही.पटेल अँण्ड कंपनी नियोजित रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम निवीदेतील अटी आणि शर्थींना धाब्यावर बसवुन केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. निवीदेतील अटी आणि शर्थी नुसार सिमेंट रस्ते आणि नाली बांधकाम करण्यासाठी कंञाटदाराकडे क्राँक्रेट बँचमिक्स प्लाँन्ट असणे अनिवार्य आहे. परंतु संबंधित कंञाटदार बँचमिक्स प्लाँन्ट विना काम करीत असुन असे करतांना सिमेंट नालीचे बांधकामाचे जागेवरच Concrete mix करून निकृष्ठ व हलक्या प्रतिचे बांधकाम साहीत्य वापरून करीत आहे. नाली बांधकामासाठी लाकडी सेन्ट्रींगचा वापर न करता लोंखडी सेन्ट्रींगचा वापर करावा, नाली बांधकाम करतांना रस्त्यावरील पाणी नाली व्दारे वाहुन जाण्यासाठी विप होल तयार करून त्याठिकाणी प्लाँस्टीक पाईप लावणे गरजेचे आहे. नालीचे बांधकाम मजबुत आणि प्रमाणशीर होण्यासाठी Needle vibrator ने बांधकाम साहीत्याची दबाई करणे आवश्यक आहे. परंतु सदर नाली बांधकामात निडल वायब्रेटरचा वापरच होत नसल्याचे पाहणीत दिसुन आले. बांधकाम सुरू करण्यापुर्वी करून दिलेल्या करारनाम्यानुसार नालीचे बांधकाम मजबुत होण्यासाठी ४३ ग्रेटचा ओपीसी सिमेंटचा वापर होणे अनिवार्य आहे. परंतु संबंधित कंञाटदार सदर कामावर ओपीसी ऐवजी पीपीसी सिमेंटचा सर्रासपणे वापर करीत असल्याचे दिसुन येत आहे, नाली बांधकाम मजबुत होण्यासाठी झालेल्या कामावर नियमितपणे पाणी टाकणे आवश्यक आहे. परंतु झालेल्या नाली बांधकामावर पाहीजे त्या प्रमाणात पाणी टाकल्या जात नसल्याचे वार्डातील नागरीकांच्या तक्रारी आहेत. नाली बांधकामासोबत सुरू असलेले रस्त्याचे काम करताना खोदलेल्या ठिकाणी पाणी टाकुन रोलरव्दारे दबाई करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित कंञाटदार पाणी न टाकता व दबाई न करता खडी टाकुन थातुर माथुर काम केल्या जात आहे. त्यामूळे त्या नाल्या आणि रस्ते किती दिवस टिकेल याविषयी शंका आहे. संबंधित कंञाटदाराकडून नियम धाब्यावर बसवुन काम केल्या जात असतांना, क्राँक्रीट बँचमिक्स प्लाँन्ट नसताना स्थानिक अधिकाऱ्यांचे या कामाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामूळे करण्यात येत असलेल्या कामाची अटी आणि शर्थीनुसार चौकशी व तपासणी करून सर्व बांधकाम नियमानुसार करण्यात यावे. अन्यथा याविरूध्द जनआंदोलन करण्यात येईल. असा इशारा राकेश रत्नावार यांनी दिला आहे. यावेळी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अभिजीत चेपुरवार, संदीप मोहबे, गणेश रणदिवे, रणजीत आकुलवार, सचिन मुळेवार, गौतम जीवने, छोटु आगबत्तनवार, गणेश कोडापे आणि कपील गुरनुले आदी उपस्थित होते.
