News 34 chandrapur
वरोरा - 31 मार्च रात्री 1 वाजता वरोरा पोलीस स्टेशनचा फोन वाजायला लागतो, फोन उचलताचं दुसरीकडून एक व्यक्ती बोर्डा गावात एका घरी चोर शिरला आहे अशी माहिती देतात.तब्बल अर्ध्या तासांनी म्हणजेच 1.30 वाजता पोलीस पथक बोर्डा येथे पोहचतात, त्या घरील व्यक्तींनी सदर चोराला रूम मध्ये बंद करून ठेवले असे सांगत पोलीस दरवाजा उघडत त्या चोराला ताब्यात घेतात.
पोलिसी खाक्या दाखविल्यावर तो युवक पोपटासारखा बोलायला लागला, त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यावर पोलिसही अवाक होतात. Love affair
तो युवक चोर नसून प्रियकर निघाला, तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री घरी आला मात्र प्रेयसीच्या कुटुंबियांना चोर असल्याचा संशय झाल्याने सदर प्रकार घडला.love k liye kuch bhi karega
वरोरा शहरातील चिकन मार्केट मध्ये ठेला चालविणारा युवक एका अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला.
प्रेमाचा रंग दोघांनाही लागल्याने एकमेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेत भेटायला सुरुवात केली, तरुणीच्या घरील आई व भाऊ बाहेर गावी गेले होते, फक्त वडील घरात होते.
तरुणीने त्याला मध्यरात्री भेटायला बोलाविले, ठरल्याप्रमाणे युवक भेटायला आला मात्र ही बाब शेजाऱ्यांना समजताचं त्यानी आरडाओरडा करीत त्या युवकाला पकडून चोप देत एका खोलीत बंद केले.
सदर तरुण आधी या ठिकाणी आला असल्याची कबुली शेजाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी युवकाला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
या प्रेमाची गोष्टही निराली होती, 10 वी नापास तरुण व अभियांत्रिकी शिक्षण घेणारी तरुणीच्या प्रेमाचा भांडाफोड शेजाऱ्यांनी केला पण चोर म्हणून पकडलेला युवक प्रियकर निघाल्याने मुलीची चांगलीच फजिती झाली.
.jpeg)