News 34 chandrapur
चंद्रपूर : साडेचार वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. मात्र मनपाने कंत्राटदाराला 200 कोटी रुपयांचे देयके वितरित करून सर्वसामान्य चंद्रपूरकरांना एप्रिल फुल बनवले असा आरोप करीत जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास मनपासमोर मळके फोडून धिक्कार आंदोलन केले.
यावेळी अमृत योजनेचे प्रतिकात्मक उदघाटन करून नागरिकांनी प्रतिकात्मक पाणी भरण्याचा प्रयत्न केला. Janvikas sena
यावेळी अमृत योजनेचे प्रतिकात्मक उदघाटन करून नागरिकांनी प्रतिकात्मक पाणी भरण्याचा प्रयत्न केला. Janvikas sena
यावेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक दीपक जयस्वाल, नगरसेविका मंगला आखरे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण ऊर्फ बाळू खोबरागडे, निर्मला नगराळे, माजी नगरसेवक राजू आखरे, शिवसेना महिला आघाडीच्या विद्या ठाकरे, प्रतिभा तेलतुंबडे वृक्षाईचे कुशाबराव कायरकर उपस्थित होते. Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation
मनपाने अमृत योजनेचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचा कार्यादेश आदेश दिला होता. मात्र कंत्राटदाराचे मनपा सत्तादारांसोबत लागेबांधे असल्याने तसेच जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याची या कामामध्ये भागीदारी असल्याने योजनेच्या कामाला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही कंत्रादारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.
त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी मनपातील भ्रष्ट सत्ताधाऱ्यांविरोधात नारेबाजी करत धिक्कार केला. 15 दिवसात अमृतमुळे खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी केली नाही तसेच कामाला गती दिला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनपा उपायुक्त अशोक गराटे यांना दिलेल्या निवेदनातून दिला. Amrut scheme
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, किशोर महाजन, इमदाद शेख, मनिषा बोबडे,मीना कोंतमवार,अक्षय येरगुडे,राहुल दडमल, आकाश लोडे,गितेश शेंडे, प्रफुल बैरम, मोंटु काटकर, इमरान रजा,आशिष रामटेके,भूषण माकोडे,अमोल घोडमारे, सतीश घोडमारे, प्रफुल बजाईत,अनिल कोयचाळे, धर्मेंद्र शेंडे, विजय बैरम आदींनी प्रयत्न केले.
अमृतचे कंत्राटदार भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत
आंदोलनादरम्यान अमृतचे प्रतिकात्मक उदघाटन करण्यात आले. यावेळी अमृत योजनेचे कंत्रादार संतोष मुरकुटे यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये नियुक्ती झाल्याचे छायाचित्र व बातमी फलकावर लावली होती. त्यामुळेच मनपाच्या सत्ताधाऱ्यांकडून कंत्राटदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी केला.

