News 34 chandrapur
चंद्रपूर : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. कन्हैया उर्फ अजय मानकर (२१) रा. तुकूम चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
Love affair with a minor girl
आरोपी मानकर हा कुलर दुरुस्तीचे काम करतो. पीडितेच्या घरी त्याने कुलर दुरुस्तीचे काम केले. यावेळी त्याने मुलीशी ओळखी केली. यानंतर तो वारंवार तिला भेटत राहिला. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमसंबंधातून दोघांत लैंगिक संबंध प्रस्थापित झाले.
दरम्यान पीडित मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली. ही बाब कुटुंबीयाच्या लक्षात येताच. त्यानी मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितले. कुटुंबीयांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे आरोपीवर भादंवि कलम ३७६, ३७६ (२), ३७६ (एन), ३५४ (डी) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (Pocso) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (Chandrapur police) आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास Bharosa सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे, एनपीसी श्रीदेवी पवार करीत आहेत.
