शेगाव - शेगाव बु. येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश घोडमारे यांची हत्या झाल्याची घटना 23 एप्रिलला उघडकीस आल्याने गावात संतापजनक वातावरण निर्माण झाले होते.
महेश घोडमारे हा अत्यंत प्रामाणिक पणे गावातील नागरिकांच्या मदतीला धावून जायचा. विविध कामे करून महेश आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. Murder mystery solve
21 एप्रिल रोजी काही कामानिमित्त महेश बाहेर गेला होता, मात्र 2 दिवस उलटल्यावर तो परत न आल्याने महेशच्याया कुटुंबाने याबाबत शेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. Chandrapur police
पोलिसांच्या तपासा दरम्यान महेश का अज्ञात व्यक्तीच्या दुचाकीवर बसून वरोरा येथे गेला होता.
मेसा समोर असलेल्या जंगलात एक दुचाकी आढळून आली, पोलिसांनी शोधाशोध केली असता निर्जन ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात महेशचा मृतदेह आढळून आला. Lcb chandrapur
प्रकरण गंभीर असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला सदर प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले.
महेश हा नेहमी नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असायचा त्याचा इतका निर्घृणपणे कोण खून करणार अशी चर्चा गावात रंगली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सपोनि संदीप कापडे, मंगेश भोयर, पोउपनी अतुल कावळे यांना शेगाव ला रवाना करीत तात्काळ गुन्ह्यातील रहस्य उलगडण्याचे निर्देश दिले.
सपोनि संदीप कापडे यांनी तपास सुरू केला असता शेगाव येथे राहणारा 19 वर्षीय स्वप्नील चौधरी याचा महेश सोबत पैश्याचा वाद सुरू असल्याची माहिती मिळाली.
कापडे यांनी स्वप्नील चौधरी ला ताब्यात घेत याबाबत चौकशी केली असता त्याने सदर हत्या केली असल्याची कबुली दिली, या घटनेत खडसंगी येथील अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती दिली.
घटना उघडकीस आल्याच्या अवघ्या 2 तासात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप कापडे यांनी आरोपीना ताब्यात घेत हत्येचं रहस्य उलगडले.
