News 34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात आज युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा भजन गायचे आहे याबाबत राजकीय तमाशा केला. navneet ravi ranaमात्र शिवसेनेचे जून रूप या माध्यमातून पुन्हा बघायला मिळाले, राणा दाम्पत्याना त्यांच्या मुंबई स्थित निवास्थानाबाहेर पडू दिले नाही. Shivsena vs rana
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. offensive post against Chief Minister Uddhav Thackeray
मात्र युवा स्वाभिमान पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी पदाला न शोभणारे कृत्य केले, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली.
त्यांच्या आक्षेपार्ह पोस्ट मुळे शिवसैनिकांचा संताप अनावर झाला, जिल्हयातील शिवसैनिकानी राजुरा गाठत युवा स्वाभिमान चे कार्यालयात तोडफोड केली. Yuva swabhiman party
जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी कार्यकर्त्यांसहित राजुरा पोलीस स्टेशन गाठत, ठाकरे विरोधात तक्रार दिली, जर सूरज ठाकरे यांच्याविरोधात कारवाई झाली नाही तर संपूर्ण चंद्रपूर बंद करू असा इशारा जीवतोडे यांनी यावेळी दिला. Shivsena chandrapur
सूरज ठाकरे फेसबुक पोस्ट मुळे अनेकदा वादात आले, सदर कृत्यामुळे शिवसेनेने अराजकता माजवली असून आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया सूरज ठाकरे यांनी दिली.
