चंद्रपूर - दिल्लीच्या अत्याचार प्रकरणातील ती "निर्भया" होती, मात्र त्या पीडित मुलीचे कुठेही नाव आले नाही, आजही त्या पीडितेला निर्भया नावाने ओळखले जाते, मात्र चंद्रपूर शहरात असा उलट प्रकार घडला आहे, आधी सोशल मीडियावर त्या शीर नसलेल्या निर्वस्त्र युवतीच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले मात्र आता तर शहरातील स्थानिक वृत्तवाहिनीने त्या मुलीचा मूळ फोटो व नावसाहित बातमी दिल्याने त्या मृतक मुलीची नियोजनबद्ध बदनामी केली.
या अक्कलशुन्य कार्यात एका अधिकाऱ्याने पूर्ण माहिती देत त्या मुलीचा फोटो शेअर केला.
4 एप्रिलला भद्रावती येथे 22 वर्षीय युवतीचे नग्नावस्थेत असणारा शीर नसलेला मृतदेह मिळाल्याने एकंच खळबळ उडाली होती.
मृतदेहाला शीर नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले मात्र सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेने 4 दिवसात सदर युवतीची ओळख पटवीत गुन्ह्यासंदर्भात माहिती मिळविली.
युवतीच्या नग्नावस्थेत असणाऱ्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने अनेकांनी यावर संताप व्यक्त केला होता, नागरिकांनी फोटो व्हायरल करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचीही मागणी केली. Defamatory breaking news
मात्र आता तर हद्दच झाली, चंद्रपुरातील स्थानिक वृत्त वाहिनीने ब्रेकिंग न्यूज च्या नादात सदर युवतीचे मूळ फोटो व नावसाहित बातमी समाज माध्यमात व्हायरल केल्याने त्या युवतीची नियोजित बदनामी केली.
त्या युवतीला का ठार केले? तिच्यावर अत्याचार तर झाला नसेल? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे.
या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चांगलीच गोपनीयता बाळगली मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपले हित संबंध जोपसण्याच्या नादात त्या युवतीचे फोटो आणि नाव जवळीक असलेल्या पत्रकारांना दिली. Bhadravati Murder
आणि काही वेळात सदर बातमी प्रकाशित झाली, त्या युवतीचा मूळ फोटो आणि नाव, नग्नावस्थेत मृतदेह असणाऱ्या त्या युवतीचा मूळ फोटो समाजमाध्यमात प्रसिद्ध झाल्याने पुन्हा बदनामीकारक खळबळ उडाली.
कायद्याचे ज्ञान नसलेल्या अक्कल शून्य पत्रकारांनी ब्रेकिंग न्युज च्या नादात मोठी चूक केली, पोलीस प्रशासनात आपलेचं मित्र आहे. Police privacy
अशी भावना बाळगत सदर वृत्त प्रकाशित झाले, सदर प्रकार नवीन नसून याआधी सुद्धा काही मोठ्या प्रकरणात संवेदनशील गुन्ह्यातील पोलीस तपासाची माहिती काही न्यूज मध्ये पत्रकार परिषद होण्याआधी प्रकाशित झाली, मात्र त्यानंतर पोलिसांनी अधिकाऱ्यांना समज दिली, मात्र आज पुन्हा संवेदनशील गुन्ह्याची माहिती व पीडित मृतक मुलीची माहिती प्रसिद्ध करून तिची बदनामी केली.
मृतक मुलगी ही कुणाची बहीण, मुलगी असेल आज त्यांच्या कुटुंबियांवर काय शोककळा पसरली असेल हे त्यांना ठाऊकच आहे, मात्र बातमी प्रकाशित करताना अशी घोडचूक नियोजन बद्ध पद्धतीने करण्यात आली असेच त्या वृत्तावरून दिसून येते. चंद्रपूर पोलिसांच्या अधिकृत प्रेसनोट मध्ये कुणाच्या नावाचा उल्लेख नाही.
विशेष म्हणजे अश्या संवेदनशील गुन्ह्याची माहिती एक जबाबदार अधिकारी कसा काय देऊ शकतो यावर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा विचार करायलाचं हवा.
त्या मुलीचे नग्नावस्थेत मृतदेहाचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने अनेकांनी कारवाईची मागणी केली, त्या पीडितेला न्याय देत आरोपींना फाशीची मागणी केली मात्र आता त्या पीडित युवतीची बदनामी करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी किती महिला संघटना करणार?

