News 34 chandrapur
चंद्रपूर - कोरोना काळात लागलेल्या लॉकडाउन मध्ये अनेक बेरोजगार झाले मात्र काहींनी गुन्हेगारीचे नवे उपद्रव सुरू केले.
घरी शांत न बसता आपण कोणत्या मार्गाने पैसे उभारू शकतो याचा काहींनी जावई शोध लावत पैसे ही कमविले मात्र काही पोलिसांना गवसले.
काही दिवसांपूर्वी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात डेटा एन्ट्रीची कामे करण्यासाठी 300 जागेसाठी पदभरती निघाली अशी जाहिरात वर्तमानपत्रात अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आली मात्र 2 दिवसांनी ती जाहिरात बनावट आहे असे जाहीर झाल्याने बेरोजगारांची चांगलीच फजिती झाली.
आता परत घरगुती मीटर बद्लविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 30 मुलांची आवश्यकता आहे असा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. job alert
मात्र स्वतः महावितरण ने ती जाहिरात आमच्या कार्यालयातून नसल्याचे म्हटले आहे, जे बेरोजगार त्या जाहिरातीला बळी पडणार त्यासाठी ते स्वतः जबाबदार असणार असे सांगितले. Virul massage
सध्या खालील मेसेज सर्वत्र फिरून राहिला आहे. याचा महावितरण चंद्रपूर परिमंडळ, चंद्रपूर मंडळ - यांचा काही एक संबंध नसून... या मेसेज वरून होणारे व्यवहार आदी साठी व्यवहार करणारी व्यक्ती व्यक्तिशः जबाबदार असेल. Unemployment fraud
*********-*************
महाराष्ट्र मधिल आईटीआई इलेक्ट्रिकल आनी वायरमैन मुलांसाठी घरघुती मीटर बदलन्या साठी कंत्राटी भर्ती प्रक्रिया शुरू.
पगार १३००० ते २००००
कामाचे ठिकाण - चंद्रपूर
पात्रता : आईटीआई इलेक्ट्रिकल/ वायरमैन
3 वर्षा साठी कॉन्ट्रेक्ट बेसिस काम
रोज 15 मीटर बदलने बंधनकारक
जिल्ह्यात 30 मुलांची आवश्कता.
काम करण्याऱ्या व्यक्तींना अपघात विमा लागू
मुलाखत साठी आपला Resume व्हॉटआप la पाठवणे आवश्यक
मूलाखाती साठी आमचा ऑफिस ला भेट दया.
Ramnagar Road, Jatpura Gate, Chandrapur, Maharashtra 442401..
कृपया गरजू व्यक्ती पर्यंत माहिती शेअर करावी...🙏🙏
(टीप - संपर्क करण्याची वेळ सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत)
