News 34 chandrapur
चंद्रपूर - 26 मार्चला शहरातील आझाद बगीचा उदघाटन कार्यक्रमात स्थानिक खासदार व आमदार यांचे नाव न टाकल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.ऐनवेळी चंद्रपूर मनपाला निमंत्रण पत्रिका बदलावी लागली, त्यामुळे उदघाटन कार्यक्रमात राजकीय गोंधळ उडाला होता.Political turmoil
त्या राजकीय गोंधळाला काही दिवस होत नाही तोवर पुन्हा राजशिष्टाचाराचे भंग होत आमदार जोरगेवार यांचा अपमान करण्याचा हेतू असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. Political protocol
4 एप्रिलला चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत इराई नदी गाळ उपसा व स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार जोरगेवार यांचं नाव सर्वात खाली टाकण्यात आले विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या उदघाटक पाहुण्यांच्या नावानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत असते. Mla kishor jorgewar
मात्र जलसंपदा विभागाने निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाचे उदघाटक विजय वडेट्टीवार यांच्या नावानंतर विशेष अतिथी महापौर राखी कंचर्लावार, खासदार बाळू धानोरकर, प्रमुख अतिथी - विधान परिषद सदस्य नागो गाणार, आमदार रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार सुभाष धोटे, किर्तीकुमार भांगडीया, आमदार प्रतिभा धानोरकर, यासर्व पाहुण्यांच्या नावानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष - आमदार किशोर जोरगेवार, प्रमुख उपस्थिती - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.
आता ह्या पत्रिकेत शासकीय अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल चा भंग जाणूनबुजून केला की चुकीने झाला की काय हे सध्यातरी न समजण्यासारखे आहे. Department of Water Resources
यानिमित्ताने आमदार जोरगेवार यांच्या नावाची शासकीय अधिकाऱ्यांना व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना अडचण आहे हे दिसून येते.
निमंत्रण पत्रिकेत आमदारांचे नाव शासकीय प्रोटिकॉल नुसार 
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधला असता त्यांनी निमंत्रण पत्रिका ही प्रोटोकॉल नुसार बनवीत, प्रशासनाकडून मंजुरी घेतल्यावर छापण्यात आली आहे.
शासकीय प्रोटोकॉल नुसार सदर पत्रिकेत कसलाही दुजाभाव केला नसून योग्य रीतसर पणे नावे मांडण्यात आली आहे.
स्थानिक आमदारांना आम्ही प्रोटोकॉल नुसार स्थान दिले असून, याबाबत गैरसमज पसरू नये अशी स्पष्टोक्ती यावेळी देण्यात आली.
आमदार जोरगेवार यांनी सुद्धा त्या निमंत्रण पत्रिकेवर असलेले नाव योग्य रित्या असून यावर माझा काही आक्षेप नाही, असे सांगितले.
