News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल नगरात सोमनाथ रोड पोस्ट आफिसला लागून क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या चौकाचे नामांतर माळी समाजबांधकडून करण्यात आले असून महात्मा फुले चौकाच्या नियोजित स्थळी क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Mahatma fuleया कार्यक्रमाला न.प.मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत , प्रा. विजय लोणबले जिल्हा अध्यक्ष महात्मा फुले समता समता परिषद, नंदू रणदिवे माजी उपाध्यक्ष, माजी नगरसेवक चंद्रकांत अष्ठानकर प्रशांत समर्थ, समजोत्थान मंडळाचे प्रा.सुधीर नागोशे, माळी महासंघाचे राकेश ठाकरे, बालगोविंद आदे, काजू खोब्रागडे, डेव्हिड खोब्रागडे, भास्कर खोब्रागडे, फुलझले सर, माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, सुजित खोब्रागडे, सुनील महाडोरे, प्रदीप शेंडे, सौरभ वाढई, शुभम निकुरे, टेकचंद महाडोरे, प्रतीक आसंवार, रवी गुरनूले,संकेत शेंडे,प्रतीक गुरनुले, राकेश मोहूर्ले,विवेक मंदाडे,अशोक निकुरे,ओमदेव मोहूर्ले यांचेसह विविध समाजाचे व अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव यांच्या उपस्थितीत क्रांती सूर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
