News 34 chandrapur
चंद्रपूर :- बळजबरीने सामायिक शेतजमिनीवर झोपडी का बांधली असे विचारणा करण्यास गेलेल्या 2 महिलांना सावत्र भावाच्या मुलाने बेदम व शस्त्राने मारहाण केल्यानंतर ही पिट्टीगुडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी ठोस कारवाई न करता थातुरमातुर कारवाई करून आरोपींना अभय दिल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फूसे यांचे नेतृत्वात पीडित महिलेचा मुलगा गणेश गोविंद तेलंग, पीडितांची बहीण रुख्मिणी चौधरी यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला, तसेच पिट्टीगुडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निलंबित करा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा ईशारा ही यावेळी देण्यात आला.
Inhuman beating of women
जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील सुमनबाई तेलंग, रुख्मिणी बाई चौधरी आणि कौशल्याबाई चौधरी यांच्या सामायिक मालकीच्या शेतजमीनीवर सावत्र भावाने बेकायदेशीरपणे ताबा करून त्या शेतात झोपडी बांधलेली होती. या गोष्टीची माहिती सुमनबाई व कौशल्याबाई यांना मिळाल्यानंतर त्या दोघीहि शेतात गेल्या. त्या दोघीनी आमच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर पणे झोपडी का बांधली याबाबत विचारणा केली असता सावत्र भावाचा मुलगा नारायण भारत तेलंग याने दोघीनाही अश्लील शब्दात शिवीगाळ करत दगड घेउन मारहान करायला सुरूवात केली, तेव्हा दोघीही घाबरून पिटीगुडा पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यास गेल्या, ठाणेदारांना घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. त्यावेळेस तिथे मारहाण करणारा नारायण तेलंग सुदधा आला. तेव्हा ठाणेदारांनी कायदेशीर कारवाई करण्या ऐवजी कारवाई करणार नाही, एस. पी. किंवा डि. वाय.एस.पी. कडे जाऊन सांगा. पण मी मात्र कारवाई करणार नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले.
The insensitivity of the police
दि.२८.३.२०२२ रोजी सुमनबाई तेलंग, रुख्मिणी बाई चौधरी आणि कौशल्याबाई चौधरी या तिन्ही बहिणी मिळुन गावातील प्रतिष्ठीत नागरिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोदावरी केंद्रे यांचे पती सुरेश केंद्रे यांच्या घरी गेल्या. त्याना घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. तेव्हा सुरेश केंद्रे यांनी नारायण तेलंग याला याबाबत विचारणा करण्याकरीता आपल्या घरी बोलविले. मात्र सुरेश केंद्रे यांच्या घरी आला नाही. त्यामुळे सुरेश केंद्रे यांनी या तिघीना तुम्ही शेतात जाऊन बांधलेली झोपडी काढुन टाका आणि काही कमी जास्त झाल्यास मला फोन करा,
सुरेश केंद्रे याच्या सांगण्यावरून तिघीही सकाळी आपल्या मालकीच्या शेतात गेल्या, त्यावेळी तिथे नारायण तेलंग सोबत दत्ता नंदेवार, बालाजी नंदेवार व सुधाकर इबीतवार सुदधा हजर होते. तिघीनीही आमच्या शेतात झोपडी का बांधली अशी विचारणा केली असता तिघीना अश्लील शिवीगाळ करत मारहान करायला सुरूवात केली. त्यामुळे या तिघीही घाबरून गावाकडे परत यायला निघाल्या. तेव्हा नारायण, दत्ता, बालाजी व सुधाकर यांनी हातात कु-हाड, काठया व लाठ्या घेऊन या तिघीनाही मारहान करायला सुरूवात केली. 'तुम्हचा आज मुर्दा पाडल्याशिवाय राहात नाही असे जोरजोराने ओरंडुन दोघीना पायावर, हातावर कु-हाडीने जोराने मारहान केली. त्या दोघीही आम्हाला मारू नका आम्ही तुम्हच्या पाया पडतो, अश्या विनवण्या करत होत्या परंतु काही ऐकुण न घेता तुम्ही कोणत्याही पोलिस वाल्याकडे किंवा एस.पी. कडे जा ते आम्हाला काहीही करू शकणार नाही असे म्हणत कु-हाडीने व काठीने मारहान करून रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या. बेशुदध झाल्याने मारेकरी पळून गेले.
गावकऱ्यांनी उपचाराकरिता पाटण आरोग्य केंद्रात नेले. याची माहिती काही लोकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस स्टेशन पिट्टीगुडाचे ठाणेदार दवाखान्यात आले. तिथे रुक्मीनीबाई चौधरी याचे पोलिसानी बयाण नोंदविले. परंतु पिडीताची तब्येत गंभीर असल्याने व मोठया प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पिडीतांना पुढील उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे पाठविले. परंतु पिडीताची तब्येत नाजुक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्वरीत जिल्हा सामान्य रूग्णालय येथे रेफर केले.
सदर घटना दिनांक २८.०३.२०२२ रोजी घडली परंतु पोलिसांनी मात्र या गंभीर घटनेची कोणतीही दखल न घेता हि किरकोळ बाब आहे असे म्हणत गुन्हा नोंदवला नाही. परंतु घटनेच्या दोन दिवसानंतर दि. ३०.३.२०२२ रोजी पोलिसांनी मात्र गैअर्जदारांविरूद्ध भा.दं.वि.चे कलम ३२६, ४२७, ५०४, ३४ अनन्वे गुन्हा दाखल केला.
सदर प्रकरणात सुमनबाई व कौशल्याबाई हया गंभीर जखमी झालेल्या असुन त्यांचे दोन्हीही हात तुटलेले आहे. वास्तविक मारहाण करणारे चारही आरोपी यांनी कु-हाड या घातक धारधार शस्त्राने या दोघीनाही गंभीर स्वरूपाची दूखापत केलेली आहे. इतकेच नव्हे तर जिवे मारण्याची धमकी देत खुन करण्याचा प्रयत्न सुदधा केलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गैरअर्जदारांविरूद्ध भा.दं.वि. चे कलम ३०७ दाखल करून त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक होते. Suspend the police
गैरअर्जदारांविरूद्ध पोलिस स्टेशन पिटीगुडा येथील अपराध क्रमांक ०८/२०२२ या प्रकरणात गैरअर्जदारांविरुद्ध भा.दं.वि.चे कलम ३०७ दाखल करून त्यांच्यावर कडक कायदेशिर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच मागणी चे निवेदन पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनाही देण्यात आले. Vanchit bahujan aghadi
सदर प्रकरणात ठाणेदार यांची भूमिका संशयास्पद असून त्यांना निलंबित करा अशी मागणी करण्यात आली, यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फूसे, पीडित महिलेचा मुलगा गणेश गोविंद तेलंग, पीडितांची बहीण रुख्मिणी चौधरी, जिल्हाध्यक्षा वबुआ महिला आघाडी कविता गौरकर, जिल्हा सदस्य भगीरथ वाळके, जिल्हा संघटक करुणा जीवने, जेष्ट सल्लागार ललिता गेडाम, भद्रावती महासचिव रेखा गणवीर आदी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
