News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील कुर्ली येथील रहिवासी दिनेश टेकाम या इसमाची कोरपना तालुक्यातील हिरापूर,येथील त्याच्या सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी मृतक दिनेशच्या भावांनी गडचांदूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Chandrapur police
निवेदनाद्वारे सविस्तर असे की,मृतक दिनेशचा सासरा हिरापूर येथून 2 एप्रिल रोजी 4 पंच घेऊन कुर्ली येथे आला होता. त्यावेळी दिनेश घरी नव्हता.विवीध घडामोडी व वादविवादानंतर सासऱ्याने घरच्यांना, दिनेशला जिवे मारण्याची धमकी दिली व मुलीला घेऊन निघून गेला. Impartial inquiry
यानंतर 5 एप्रिल रोजी दिनेशला हिरापूर येथे बोलवण्यात आले व 7 एप्रिल रोजी दिनेशचा मृत्यू झाल्याची बातमी फोनद्वारे आम्हाला कळली. तेव्हा लगेच हिरापूर येथे गेलो असता दिनेशचे शव शवविच्छेदनासाठी खोलीत ठेवलेले होते. Plotted murder? कटकारस्थान रचून दिनेशला त्याच्या सासऱ्यानेच मारले ? असा गंभीर आरोप मृतक दिनेशच्या भावाने केला असून या हत्येची निष्पक्ष चौकशी करून माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी गणेश यांनी निवेदनाद्वारे केली आहे.कोरपना तालुका शिवसेना प्रमुख तथा न.प.शिवसेना गटनेता सागर ठाकूरवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक रायपुरे यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी गणेश टेकाम,संजय निखाडे,रोहिदास ठाकरे, संभा टेकाम,सलमान शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आता यासंदर्भात काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
