News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात उत्कृष्ठ धनाची बाजारपेठेत म्हणून ओळख असलेल्या मुल शहरात मुल नागपूर रोडवरील भाग्यरेखा समोर अमोल इंटरप्रायझेस राईसमील स्टोरेक्स युनिटमध्ये अनेक वर्षांपासून उच्च प्रतीच्या कोलाम ब्रँड तांदळाचे उत्पादन केले जात असून या तांदळाला मुंबई, पुणे, सोलापूर,औरंगाबाद यांचेसह इतरही राज्यात भरपूर प्रमाणात मागणी आहे.
दरवर्षी लाखो टन तांदूळ उत्पादन होत आहे. याच राईस मिलला लागूनच धानाच्या कोंड्याचे गोडाऊन आहे. कोंड्यालाही चांगला भाव असते. राईस मिल व्यापारी अमोल इंटरप्रायझेस यांच्या गोडाऊन मध्ये हजारो ट्रक कोंडा जमा झाला होता. सध्या संपूर्ण भारतात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक असून दिवसेंदिवस तापमानात भर पडत आहे. अधिक उष्ण तापमानामुळे काल मध्यरात्रीच्या वेळेला अचानक गोडाऊन मधील कोंड्याला आग लागल्याने पूर्ण कोंबडा जळून खाक झाला. Fierce fire at the godown
त्यामुळे राईस मिल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे आमचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली असता अमोल इंटर प्रायझेसचे मालक अमोल बचुवार यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले. Huge fire सकाळी राईस मिल कडे जाऊन बघितले असता कोंड्याच्या गोडाऊन मधून खूप आगीचा धूर निघत असल्याचे लक्षात येताच तात्काळ मुल येथील अग्निशमन दलाची गाडी बोलावण्यात आल्याने आगीवर नियंत्रण करण्यात काही प्रमाणात यश आले. तरी देखील अजूनही आग विझवणे सुरूच आहे. कोंड्याच्या गोडाऊनला लागूनच राईस मिलमध्ये लाखो टन धानाचे पोते व पिसाई केलेले तांदळाचे पोते होते. कदाचित आग नियंत्रणात आली नसती तर खूप मोठी वित्त हानी झाली असती.

