घुघुस - धार्मिक तेढ व बदनामीचे अग्रेसर माध्यम म्हणजे सोशल मीडिया, या साधनांचा उपयोग चांगल्या कामासाठी ही होतो मात्र आता फक्त भांडण, बदनामी व धार्मिक तेढ निर्माण करण्यावर या साधनांचा उपयोग केल्या जात आहे. Defamation on Facebook
असाच एक प्रसंग घुघुस कांग्रेसबाबत घडला आहे, सध्या चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला सुगीचे दिवस आले मात्र काहींना पक्षाची भरारी बघितल्या जात नसल्याने सतत बदनामी कारक पोस्ट काँग्रेस विरोधात केल्या जात आहे. Defamatory post
घुघुस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांची जनमानसात प्रसिद्ध झालेल्या प्रतिमेला डाग लावण्याचे काम "घुघुस का सत्या" व "गब्बर जाग जायेगा" या फेसबुक आयडी वरून होत आहे.
याचंच एक उदाहरण म्हणजे हनुमान जयंतीला राजू रेड्डी यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना चंद्रपुरातील चौधरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
फेसबुक आयडी घुघुस का सत्या वरून काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी पत्नीसोबत झालेल्या भांडणात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी पोस्ट टाकण्यात आली होती.
त्यानंतर रेड्डी यांच्या पत्नीने रेड्डी व त्यांच्या प्रेयसीला मारहाण केल्याची पोस्ट केली होती.
गब्बर जाग जायेगा या फेसबुक आयडी वरून संविधान विरोधी पोस्ट करीत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता.,
काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांनी आपल्या समर्थकांसह घुघुस पोलीस स्टेशन गाठत दोन्ही आयडी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सध्या चंद्रपुरात कुणाची बदनामी करण्यासाठी अनेकांनी जणू आपला धंदाच मांडला आहे, प्रतिष्ठित व्यक्ती विरोधात पोस्ट करायची व नंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचे असा सपाटा काही जणांनी लावला आहे. Chandrapur cyber cell
सायबर सेल आता या प्रकरणाचा तपास करीत असून बदनामी करणाऱ्यांचे पितळ लवकरच उघडे पडणार आहे.
