News 34 chandrapur
चंद्रपूर /गडचिरोली :- विज बिल थकल्याने तात्पुरता खंडीत करण्यात आलेल्या चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 154 जिल्हा परिषद शाळेंचा विज पुरवठा शनिवार दिनांक 23 एप्रिलला सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आलेला आला आहे. Power supply resumed
गडचिरोली जिल्हातील महावितरणची वीजजोडणी असलेल्या 68 तर चंद्रपूर जिल्ह्यातील 86 जिल्हा परिषद शाळेंचा विज पुरवठा 12 लाख 41हजार रुपयांच्या थकबाकीसाठी नाईलाजाने तात्पुरता खंडीत करण्यात आला होता.
Zilla parishad परंतु शासन स्तरावर विज बिलाबाबत झालेल्या निर्णयानंतर महावितरण मुख्य कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत दोन्ही जिल्हातील तात्पुरता खंडीत करण्यात आलेल्या 154 जिल्हा परिषद शाळेंचा विज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. Msedcl आलापल्ली 16, भामरागड 6, चामोर्शी 18, एटापल्ली 4, मुलचेरा 2, आरमोरी 2, धानोरा 4, गडचिरोली 2, कोरची 4, कुरखेडा10, गडचांदूर11, गोंडपिपरी 2, जिवती16, पोंभुर्णा5, राजुरा 14, चंद्रपूर 2, मूल1, सावली 5, चिमूर 7,वरोरा 8, ब्रम्हपुरी 8, नागभीड 1, सिंदेवाही 6 अशा 154 शाळांचा विजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
