News 34 chandrapur
चंद्रपूर : जगन्नाथ बाबा मठासमोरील दारु दुकानाविरोधात परिसरातील नागरिक एकवटले आहेत. गजबजलेल्या व धार्मिक स्थळाच्या शेजारी देशी दारुच्या दुकानाला परवानगी दिलीच कशी, असा रोष परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. Liquer shop permission
दरम्यान मनपाने दारु दुकानाच्या परवानगीशी मनपाचा संबंधच नसतो, असे हास्यास्पद स्पष्टीकरण दिले. मात्र दारु दुकान परवानगीशी मनपाचा कसा संबंध असतो याबाबत आपण लवकरच पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे. Jan vikas sena

१७ एप्रिल रोजी जन विकास सेनेच्या युवा आघाडीचे प्रफुल बैरम, गोलू दखणे तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदीप कष्टी यांच्या नेतृत्वात जगन्नाथबाबा नगर परिसरातील नागरिकांनी उद्घाटनाच्या दिवशीच देशी दारूचे दुकान बंद पाडले होते. त्यानंतर दारू दुकानासमोर नागरिकांनी सत्याग्रह आंदोलन सुरु केले. महिलांनी भजन आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार पत्रे पाठविण्याचे अनोखे आंदोलन सुरु केले. Five thousand letter
दरम्यान २४ एप्रिल रोजी जगन्नाथबाबा नगरमधील सदर देशी दारू दुकानाच्या परवानगीसंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. यात दारू दुकानाच्या परवानगीशी मनपा प्रशासनाचा संबंध असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवून मनपाची बदनामी करण्यात येत असल्याचे तसेच दारू दुकानाच्या परवानगीशी मनपाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र मनपा प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याची तसेच मनपा प्रशासनाची भूमिका हास्यास्पद Ridiculous role असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दारू दुकानाच्या परवानगीशी मनपा प्रशासनाचा काय संबंध असतो, याचा लवकरच पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.