News 34 chandrapur
घुग्गुस - शहरात श्रीराम नवमी यावर्षी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील गांधी चौक ते इंदिरानगर चौक पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली. यावेळी सामाजिक संघटना, मंडळांनी शोभयात्रेने सहभाग घेतला व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या शोभायात्रेत प्रभू श्रीराम यांच्या भव्य मूर्ती, लायटिंग, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी यामुळे शोभायात्रा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. यावेळी ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात शहर दुमदुमले होते. डीजे च्या आवाजात श्रीरामांच्या गाण्यावर शहर निनानदले होते.
प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवनातून जगण्याचा आदर्श निर्माण केला. धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठेचं महत्व दाखवून दिले. श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामांना वंदन करण्यासाठी हिंदूधर्मीय एकत्र येतात. Jai shri ram
परंतु घुग्गुस शहरातील मुस्लिम बांधवांनी येणाऱ्या शोभयात्रेचे स्वागत करत आयोजकांचा सत्कार यावेळी केल्याने हिंदू मुस्लिम बंधुता दिसून आली तसेच यावेळी सामाजिक सौहार्दाचे दर्शन नागरिकांना झाले. रविवारी राम नवमीनिमित्त शहरात रविष विनय सिंग व श्रीकांत नूने व मित्रपरिवारच्या वतीने भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
Shri ramnavami
 गांधी चौक पासून निघालेल्या शोभयात्रेचे इंदिरानगर येथे समापन झाले. जिल्ह्यात गत दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड असल्याने गर्दी होणारे जाहीर कार्यक्रम, मोठे उत्सव, मिरवणुकांवर मर्यादा होत्या. मात्र काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले असून, यंदा प्रथमच मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राकेश दिंडीगाला, उमेश गुप्ता, अनिल रॅम, सुनील सिलका, राहुल यदुवंशी, रोहित घोरपडे, भीम यादव यांनी सहकार्य केले.
