News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदेने शहरातील विविध विकास कामांना मजूरी दिली मात्र यातील काही कामे कित्येक दिवसांपासून खितपत पडली आहे.त्याच बरोबर या नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी येथील सर्वसामान्यांना विविध मुद्द्यांवर वेठीस धरले असून जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर नगरपरिषदेचे लक्ष वेधून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे या मागणीसाठी 13 एप्रिल रोजी गडचांदूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानिक नगरपरिषदेवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. Bjp gadchandur
"प्रभाग क्रं.2,दीनदयाल नगर येथील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी न.प.कडून मोजणीची रक्कम भरून 1 वर्ष झाले मात्र अजूनही मोजणी झाली नाही ती तात्काळ करून अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयास पाठविण्यात यावा. थकबाकी मालमत्ता व पाणीपट्टी करावर लावण्यात आलेली 2 टक्के दंड(व्याज)रद्द करावा. प्रभाग क्रं.2 येथील विकास काम,नागरी दलित वस्ती फंडातून घेण्यात आले व संबधित विभागाच्या मंजुरीसाठी पाठविले,त्याला 1वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही मंजुरी नाही.त्या कामाचा पाठपुरावा करून विनाविलंब करावा.कित्येक महिन्यापासून बंद पडलेले येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज परिसर सौंदरीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे.स.न.336, 367/1 ओपनस्पेसचे सौंदर्यीकरणचे बंद असलेले कामे तात्काळ सुरू करावी.मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारांना दंड आकारून वसूल करावा.सम्राट नगर (होंडा शोरूम मागे)येथील रोड व नालीची कामे करण्यात यावी. राजीव गांधी चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्याचा काम करावा.जोगी नगरातील नागरिकांनी दिलेल्या त्या निवेदनाची चौकशी करावी,तिथे विकास कामे करावी.स.न.104 मधील ओपनस्पेस मधील शिल्लक ओपनस्पेसचे सौंदर्यीकरण करून उर्वरीत निधी ठरावात घेतलेल्या ओपनस्पेसवर खर्च करावा.मुसा ले-आऊट मधील बोअरवेल मंजूर होऊन दिड वर्ष झाले मात्र अजूनही बोअरवेल मारण्यात आली नाही. ती तात्काळ मारण्यात यावी.शेडमाके चौक ते रेल्वे गेटपर्यंत(दोन्ही बाजू)रोड साफ करून साचलेली माती काढावी व होत असलेले धूळ प्रदूषण बंद करावे.शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई व कचरा उचलण्यात यावा तसेच सरकारी शौचालयाची साफसफाई करावी.
घनकचरा व्यवस्थापकाकडून नियम अटी-शर्तींनुसार काम मागील 1 वर्षापासून होत नसल्याने त्याच्या बिलात कपात करून बिल द्यावे. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना तिसर्या अनुदान किस्तसाठी सभेला विषय घेऊन ठराव पारित व शासनाकडे पाठपुरावा करावा.वैशिष्ठपूर्ण योजनेतील 2,10 कोटींच्या कामांचे कार्यादेश व उदघाटन केले,बोर्ड लावले, परंतू 2 ते 3 महिने लोटून सुद्धा त्यातील अजूनही काही काम सुरू झाले नाही.ते तात्काळ सुरू करावे." अशी मागणी मोर्चेकरांची होती.सदर मोर्च्यात भाजपचे विविध आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारापासून त्रस्त नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. ज्यावेळी मोर्चा नगरपरिषदेवर धडकला त्यावेळी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, विविध खात्याचे सभापती नगरपरिषदेत हजर नव्हते.मोर्चेकरांच्या भेटीसाठी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वारंवार नगराध्यक्षांना दूरध्वनीवरून विनंती करीत होते मात्र नगराध्यक्षांनी नगरपरिषदेला येण्यास टाळले. वास्तवीक पाहता एवढ्या रखरखत्या उन्हात जनता आपली समस्या घेऊन आल्यावर नगराध्यक्ष,उपाध्यक्ष व सभापतींनी उपस्थित राहणे आवश्यक होते मात्र असे झाले नाही. शेवटी उपस्थित प्रशासकीय अधिकारी सोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे.या सर्व मागण्यांचे लवकरात लवकर समाधान न झाल्यास येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपतर्फे यावेळी देण्यात आला आहे."विषय गंभीर आहे पण शासनप्रशासन गंभीर नाही" अशी खंत यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे.
---------//--------
