News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त 13 एप्रिल रोजी थुटरा येथे "महाबोधी बहुउद्देशीय बौद्ध मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर नगरपरिषद नगरसेवक राहूल उमरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव भिवापूरे, मंडळाचे अध्यक्ष विजय चूनारकर, उपाध्यक्ष जगदीश धवणे,सचिव नितेश रामटेके, मंडळातील समस्त सदस्य व शहरावासीयांची उपस्थिती होती. या शिबिरात नगरसेवक उमरे सह 50 पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले.
