News34
चंद्रपूर - महात्मा जोतिबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूर च्या वतीने 20 मार्च ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, चंद्रपुर येथे Marriage Bureau अंतर्गत युवक-युवती परिचय मेळावा, धन्म मेळावा, संविधान परिषद चे आयोजन केलेले आहे.अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष गोकरण (राजू)खोब्रागडे यांनी बुधवार(16मार्च)ला दिली. The Constituent Assembly
यावेळी समितीचे सचिव दिलीप वावरे,रमेश रामटेके, अशोक देवगडे,तुकाराम देशपांडे,बंडू फुलझेले आणि अशोक देवगडे यांची उपस्थिती होती.
खोब्रागडे म्हणाले,20 मार्च,रविवारला प्रथम सत्रात सकाळी 10.00 वाजता युवक-युवतींची नावे नोंदणी 11.00 वाजता धम्म ध्वजारोहण व सामुहिक वंदना आणि युवक-युवती परिचय मेळाव्याचे उद्घाटन मा. डॉ. प्रमोद काटकर, प्राचार्य एस.पी. कॉलेज, चंद्रपूर यांचे हस्ते होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी समितीचे कार्याध्यक्ष गोकरण खोब्रागडे तर कविता मडावी( राजुरा) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. wedding Bureau
व्दितीय सत्रात धम्ममेळावा तथा संविधान परिषद चे आयोजन दुपारी 3.00असून.यावेळी उदघाटक म्हणून आ किशोर जोरगेवार यांची तर मुख्य मार्गदर्शक म्हणून संविधान फाउंडेशन नागपूरचे संस्थापक अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे यांची तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी म.ज्यो.फुले तथा डॉ.बा.आं. वि.सं.स. चंद्रपुरचे अध्यक्ष विजय उमरे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाखा कांबळे, अतुलकुमार खोब्रागडे,धम्मानंद मनवर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यातील बौध्द बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
म. ज्योतिबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूरने केले आहे.
