चंद्रपूर - छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्या विरोधात चंद्रपूर शहरात महिला संघटनांच्या वतीने शहरातील गिरनार चौक येथे निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्या विरोधात विविध संघटनांनी निषेध आंदोलन करीत राज्यपालांच्या विरोधात निदर्शने करीत राज्यपालांना तात्काळ पायउतार करा अशी मागणी संघटनांच्या वतीने डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी केली.
राज्याचे राज्यपाल कोशारी यांनी इतिहासाला खोडत चुकीची माहिती व महापुरुषांचा अवमान करीत आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्यांच्या बेताल वक्तव्याने राज्यभरात पडसाद पडले. Offensive statement
चंद्रपुरात आज जिल्ह्यातील सामाजिक संघटना व महिला संघटनांनी Dr. Abhilasha Gavature यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केले, मागील काही दिवसांपासून कोशारी यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहे, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून तात्काळ त्यांना पदावरून पायउतार करावे अन्यथा महाराष्ट्र बंद करू असा इशारा डॉ. गावतुरे यांनी यावेळी दिला.
