News34
चंद्रपूर - राजूरा येथील नावे समीर देविदास निकोडे, येथील गरीब विद्यार्थ्यांला राजूरा येथील एका शाळेने शालेय फि न भरल्या मुळे सुरू होणार्या १०वी च्या परीक्षेचे हाॅल टिकिट दिले नाही, याकरिता विद्यार्थी व पालकाने शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भुवनजी सल्लाम व शहर समन्वयक बबलू चव्हाण यांच्या कडे धाव घेतली. 10th class hall ticketsसदर विषयावर त्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांच्या कडे विद्यार्थ्यांला आपन मदत करावी म्हणून विषय मांडला लगेच बबलू चव्हाण यांना शाळेत जाऊन प्राचार्य यांच्याशी बोलने करून द्यावे या करिता गेले असता ते अनुपस्थितीत असल्याने व मोबाईल वर काॅल केले असता त्यांच्याशी वारंवार काॅल करून बोलने नाही झाल्यामुळे सकाळी पेपर असल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आले.10th board exam 2022
काय करावे काय नाही या स्थितीत असतांना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता रात्री ८.३० वाजता शिक्षणाधिकारी मस्के मॅडम यांना निलेश बेलखेडे यांनी काॅल करून चर्चा केली व नुकसान होऊ नये याकरिता पुढाकार घ्यावा हि मागणी करताच लगेच १५ मिनीटात शिक्षणाधिकारी मॅडम यांनी सूत्र हलवून त्या विद्यार्थी च्या समस्येचे निराकरण करून दिले व विद्यार्थ्यांला सकाळी हाॅल टिकिट मिळेल असे आश्वासन शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी काॅल करून जिल्हाप्रमुख यांना दिल्या गेले.exam hall tickets
जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांनी असे प्रकार यापुढे घडू नये याकरिता सर्व संस्था चालकांना शिक्षण विभागांनी नोटीस काढून समज द्यावी हि मागणी केली असता शिक्षण विभागाकडून उद्याच परिपत्रक काढून सर्वांना या विषयावर गांभिर्याने सांगितले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. Yuvasena help student
इतक्या रात्री सुद्धा काॅल वर मदतीसाठी सक्रिय डेप्युटी शिक्षणाधिकारी मस्के मॅडम व शिक्षण विभागाचे चंद्रपूर युवासेना च्या वतीने आभार मानण्यात आले. या मदतीने विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला व त्यांनी शिवसेना-युवासेना चे आभार मानले.
