News34
मूल (गुरु गुरनुले)
एकेकाळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला राहीलेला मूल तालुका पुन्हा काॅंग्रेसचा बालेकिल्ला होण्यासाठी मी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे. आता कामाला लागा, असा विश्वास राज्याचे मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिला.
Congress news
Congress news
तालुका व शहर काॅंग्रेस पार्टीच्या वतीने आयोजीत कार्यकर्ता व पक्ष प्रवेश कार्यक्रमात ना. वडेट्टीवार बोलत होते. indian national congress
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदेश काॅंग्रेसचे सचिव संदीप गड्डमवार, मध्यवर्ती बॅंकेचे संचालक डाॅ. विजय देवतळे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, जिल्हा महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा चित्रा डांगे, तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, प्रदेश काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरूदास चौधरी, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अखील गांगरेड्डीवार, पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली पुल्लावार, माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, महिला अध्यक्ष रूपाली संतोषवार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, माजी नगरसेवक विनोद कामडे आणि ललीता फुलझेले आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी केले. Congress workers meet
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना महिला जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे यांनी काॅग्रेस मध्यें महिलांना सन्मान मिळतो असे मत व्यक्त केले तर घनश्याम मुलचंदानी आणि संदीप गड्डमवार यांनी तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होवून पक्षाची धुरा सांभाळल्यास तालुक्यात काॅंग्रेसचा बोलबाला झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास व्यक्त केला. congress leader
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संतोषसिंह रावत यांनी कित्येक वर्षापासून आमदाराविना असलेले मूल तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्ते आजही पक्षाशी एकनिष्ठ व खंबीर आहेत, मन मे है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन असे म्हणत पक्षकार्ये करीत असल्याने संभाव्य निवडणुकांचा काळ लक्षात घेता विजयभाऊंनी मूल तालुका दत्तक घ्यावा. अशी विनंती केली. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, निवृत्त प्राचार्य सुनिल बल्लमवार, विनोद आंबटकर, सतिश राजुरवार, वंचित बहुजन आघाडीचे फुलचंद गोंगले, युवराज दुर्गे यांचेसह वेगवेगळया पक्षातील एकुण पंचेवीस कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. ना. विजय वडेट्टीवार यांनी काॅंग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सौ. रत्नमाला चौधरी यांची मूल शहर काॅंग्रेस पार्टीच्या शहरअध्यक्ष पदी तर स्मिता कामडे यांची सचिव पदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिले. यावेळी तालुक्यातील काॅंग्रेस पक्षाकडून निर्वाचित झालेल्या सरपंच आणि उपसरपंच हयांचा ना. विजय वडेट्टीवार यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन बंडु गुरनूले यांनी तर शहर सचिव सुरेश फुलझेले यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो महिला व पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांताराम कामडे, संदीप कारमवार, डाॅ. पद्माकर लेनगुरे, विवेक मुत्यलवार, संदीप मोहबे, रंजीत आकुलवार, दिवाकर तिवाडे, गणेश रणदिवे, दिनेश जेड्डीवार आदींनी परिश्रम घेतले.
