News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील "कुसल शरीफ़" येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही "हजरत दुल्हेशाह बाबा रहे. अलैह" यांच्या वार्षिक उर्स उत्सवाला 14 मार्चपासून सुरूवात झाली आहे.
तीन दिवसीय या उर्समध्ये एकतेचे अदभुत दर्शन घडत असून हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय भक्त-भाविक दर्शनासाठी येथे येतात. Annual Urs निसर्गरम्य अशा वातावरणात पुरातन काळापासून येथे बाबांची मज़ार(समाधी)असून गेल्या अनेक वर्षांपूर्वी दख्खन प्रांतातील हे बाबा दुल्हा (नवरदेव) बनवून वरातीसह येथे थांबले होते.तेव्हा बाबा येथून अचानकपणे घोड्यासह अदृष्य झाल्याचा इतिहास काही पूर्वज सांगतात.कुसळ हे गाव पुर्वी "कुसर गवताचे" या नावाने प्रसिद्ध होते. News 34 chandrapur
अशी माहिती असून परिसरात पुरातन काळातील गढी क्षेत्रात धान्य कोठाराचे पेव,पिण्याच्या पाण्याची विहिर, दर्गा, मुर्ती, पहायला मिळत असल्याने एकेकाळी हे गाव राजवंशाचे असावे असा अंदाज बांधला जात आहे. याठिकाणी दरवर्षी पारंपारिक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.ऐकतेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या या तिर्थस्थळावर चंद्रपूर,जिल्ह्यासह नागपूर,वर्धा,यवतमाळ,नांदेड व तेलंगणा राज्यातून हजारो सर्व धार्मिक बांधव मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येवून दर्शन घेतात.14,15,16 मार्च या कालावधीत उर्स उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाही अनेक भाविक,भक्तांच्या उपस्थितीत उर्स उत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा केला जाणार असल्याची माहिती दर्गा व्यवस्थापक कमेटीद्वारा देण्यात आली आहे.
