News34
कोठारी
मागील पंधरा वर्षांपासून कोठारीतील जनता पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. मात्र प्रशासन निगरगट्ट बनले असून जनता पाण्यासाठी रस्त्यात उतरली आहे.आज मंगळवार पासून स्थानिक ग्राम पंचायती पुढे Vanchit Bahujan Aghadi वंचित बहुजण आघाडीने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. Fast unto death
कोठारी बल्लारपूर तालुक्यातील महत्वाचे गाव असून गावाची लोकसंख्या दहा ते पंधरा हजाराच्या दरम्यान आहे.गावात रस्ते,गटारे,दिवाबत्ती व पाण्याची प्रमुख समस्या आहे.गावातील समस्या दूर करण्यासाठी गावकरी आपले प्रतिनिधी मतदानाने सभागृहात पाठवीत असतात.मात्र गावकऱ्यांच्या मूलभूत नागरी समस्या दूर करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ग्राम पंचायत सदस्य व प्रशासन पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष घालून ती निस्तारण्यापेक्षा ठेकेदारी करीत स्वतःचे उखळ पांढरे करण्यात गुंतले असल्याने गावात त्यांच्याप्रती भयंकर नाराजी पसरली आहे.
कोठारीतील पाणी समस्या गंभीर असल्याच्या तक्रारी आ. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी साडेतीन करोडची योजना खनिज विकास निधीतून (Mineral Development Fund) मंजूर केली.त्याचे बांधकाम होऊन ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली.मात्र तरीही अनेक अडचणी निर्माण करून पाणी गावकऱ्यांच्या घागरीत पोहचले नाही.मागील पाच वर्षांपासून पाण्याचा थेंबही गावकर्यांना मिळाला नाही.पाण्यासाठी गावकर्यांनी अनेक आंदोलने, निवेदने दिले मात्र ग्रामपंचायतीला पाझर फुटला नाही.
अखेर या उन्हाळ्यात तरी नलयोजनेचे शुद्ध पाणी गावकर्यांना मिळावे व गावतील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे ग्राम पंचायत समोर जिल्हा महासचिव धीरज बांबोडे व ग्राम पंचायत सदस्य अमोल कातकर आमरण उपोषण सुरू केले आहे.आतातरी प्रशासन जागे होउन (water supply) पाणीपुरवठा सुरू करतील अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत.या आंदोलनाला जल वंचित गावकऱ्यांचे चांगलेच पाठबळ मिळत आहे.
उपोषणातील मागण्या
१)साडेतीन करोडची नालयोजना त्वरित सुरू करा
२)कोठारी तहसील चा प्रश्न मागील पंधरा वर्षांपासून रखडला आहे.कोठारी तहसील घोषित करावी
३)राष्ट्रीय महामार्ग कोठारी येथे रास्ता दुभाजक करून रुंदीकरण करून सौंदर्यीकरण करावे.
४)बस स्थानक परिसरात स्वछतागृह तयार करावे.
५) गावातील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था असून रस्ते व गटारे दुरुस्ती करावी.
६)नळयोजना कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी.
