News34
चंद्रपूर:- डब्ल्यू. सी. एल. कॉलनी, दुर्गापूर वस्ती मागील परिसर व नेरी कोंडी या परिसरात मागील काही महिन्यांपासून Tiger, बिबट, अस्वल या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून मागील महिन्यात वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात सतत दोन दिवस दोन नागरिकांचे जीव गेले.
Wild animal
त्यानंतर वनविभागाने सदर परिसराची पाहणी केल्यानंतर या परिसरात वाढलेले झाडी झुडपे हे या वन्यप्राण्यांसाठी सोयीचे झाले असून येथे वाढलेला कचरा तात्काळ साफ करण्याचे निर्देश वनविभागाने वे को.लि. व्यवस्थापनाला दिले होते.
Animal attack
मागील महिन्यात वन विभागाने सुचविलेल्या काही ठिकाणी वे.को.लि. प्रशासनाने व्हीलडोजर व JCB च्या साह्याने साफसफाई केली. मात्र मागील काही दिवसांपासून वे.को.लि. द्वारा या परिसराची साफसफाई करणे बंद केले आहे.
animal attack peoples
ज्या ठिकाणी वनविभागाने वे.को.ली. ला wcl सफाई करण्याचे निर्देश दिले होते व या ठिकाणीं बिबट्या मोठ्या प्रमाणत येऊ शकते अशी शंका उपस्थित केली होती त्याचं ठिकाणी दोन दिवसापूर्वी बिबट्या अनेकदा आला असून अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिले होते.
Forest
म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात दुर्गापूर सब एरिया विभागाचे उपव्यवस्थापक मा. श्री. अरुणजी लाखे यांची प्रत्यक्ष भेट घेत दुर्गापुर डब्लू. सी. एल. कॉलनी, वॉर्ड नंबर २ व वॉर्ड नंबर ३ स्मशानभुमी च्या लगत असलेल्या ठिकाणी वाढलेल्या झाडाझुडपांची तसेच नेरी गावातील स्मशानभूमीच्या मागील परिसराची तात्काळ सफाई करणे सुरू करावे या मागणीकरिता लेखी निवेदन दिले.
animal attack human death
यावेळी ग्रामपंचायत दुर्गापुरच्या सरपंचा सौ. पूजाताई मानकर, माजी सरपंच मा. अमोल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य निखिलजी हस्ते, ग्रामपंचायत सदस्य सौ. वर्षाताई रत्नपारखी, सामाजिक कार्यकर्ते मा. सचिनजी मांदाडे, मा. महेशभाऊ जुमनाके हे उपस्थित होते.
wild animal attack human
येत्या तीन दिवसात वे.को.लि. ने झाडं-झुडपांच्या सफाईला सुरुवात न केल्यास वे.को.ली. दुर्गापूर च्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.