News34
चंद्रपूर, दि.12 मार्च : जिल्हयात शनिवारी (दि.12) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही.जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
Public news chandrapur
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 952 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 376 झाली आहे. सध्या 9 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 87 हजार 196 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 86 हजार 853 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
Chandrapur local news
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. Corona update