चंद्रपूर - सध्या शहरात दारूच्या व्यसनासहित युवकांना विविध व्यसनांनी ग्रासले आहे, ज्यामध्ये गांजा चा समावेश आहे. cannabis sales
चंद्रपुरात चक्क चिकन विक्रेता युवकांना गांजा विकण्याचा धंदा करायचा, मात्र गांजा विक्रेता कन्हैया रामनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
रामनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धोबे यांना मुखबिर द्वारे मिळालेल्या माहितीनुसार 42 वर्षीय चिकन विक्रेता कन्हैया नारायण कुंडू रा. प्रगती नगर, बल्लारपूर बायपास रोडवरील आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करीत आहे.Cannabis sale by chicken seller
रामनगर पोलिसांनी सापळा रचत कन्हैया च्या घरी धाड मारीत झडती घेतली असता तब्बल 2.072 किलोग्राम गांजा आढळून आला. ndps case laws
पोलिसांनी 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी कन्हैया वर कलम 20(B), (B) 22 एनडीपीएस ऍक्ट 22 b ndps act अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. Chandrapur police
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, पेतरस सिडाम, पुरुषोत्तम चिकाटे, किशोर वैरागडे, विनोद यादव, पांडुरंग वाघमोडे, भावना रामटेके, बुलटी साखरे यांनी पार पाडली.