News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषद हल्ली काही ना काही कारणाने सतत प्रकाश झोतात असते. मग ते ओपनजिम असो की, शहरातील विकास कामे असो,सगळ्याच बाबतीत जनतेत बोंबाबोंब सुरू आहे. "हम करे सो कायदा" म्हणीप्रमाणे याठिकाणी कारभार सुरू असून शेवटी येथे चालले तरी काय हेच कळेनासे झाले असे आरोप होत आहे.
न.प.ने नागरिकांना अक्षरशः वेठीस धरल्याचे चित्र दिसत असून आता दंड (intrest) सह पुर्ण पैसे भरा" न.प.च्या या फतव्याने जनतेला हैराण करून सोडले आहे. "सत्ताधारी मस्त,जनता त्रस्त" असे आरोप केले जात असून आगोदरच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले,व्यापार ठप्प झाले,परिवाराचे पालनपोषण कसे करायचे हा प्रश्न भेडसावत असताना आता न.प.कडून होणारा मनस्ताप सहन होत नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर येथील प्रभाग क्रमांक 3 येथील रहिवासी बंडू शंकर क्षीरसागर नामक सलून व्यवसायिक व्यक्ती 9 मार्च रोजी कर भरण्यासाठी नगरपरिषदेत गेला असता कर विभागाने याचे म्हणणे ऐकून न घेता यांच्यासोबत गैरवर्तन केल्याची माहिती आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे (corona Pandemic) व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हालाकीची बनली आहे. यांच्याकडे मागील 3 वर्षापासूनचे घर टॅक्स थकले आहे. दिवसेंदीवस Tax मध्ये वाढ होत असल्याने बंडू यांनी उसनवारी करून कसेबसे रकमेची जुळवाजुळव करून प्रामाणिकपणे न.प.मध्ये टॅक्स भरण्यासाठी गेला असता त्यांना मुद्दल रक्कम 9 हजार 630 व दंड (व्याज) 2 हजार 114 रुपये अशी एकूण 11हजार 744 इतकी रक्कम भरण्यास सांगितले. परंतू त्यांच्याकडे ऐवढी रक्कम नसल्याने थकबाकी भरतो आणि उर्वरित काही दिवसानी भरतो, हे जमा करा, अशी विनंती केली.मात्र कर विभागातील कर्मचाऱ्यांनी याला विरोध दर्शवत,तुम्ही कितीही मस्का मारले तरी एक रुपयाही कमी होणार नाही,पुर्ण रक्कम भरावीच लागेल अशी तंबी देत रक्कम स्विकारली नाही.टॅक्स भरण्यासाठी जुळवाजुळव केलेली रक्कम न स्विकरल्याने ही रक्कम सुद्धा इतर कामात खर्च होऊ शकते व टॅक्सचा लावलेला 2 टक्के दंड (व्याज) चा भुर्दंड पडेल आणि तो भरणे शक्य होणार नाही अशी चिंता बंडू यांना सतावत असल्याने कृपया 10 हजार स्विकारून उर्वरित रक्कम भरण्याची सवलत द्यावी अशी कळकळीची विनंती करूनही काहीच परिणाम झाला नाही.दरम्यान बंडू यांनी न.प. नगराध्यक्षांना दूरध्वनीवरून संपर्क करून याविषयीची माहिती दिली असता "तो आफिसचा विषय आहे,ते त्यांच्या लेव्हलवर सोडवतील,तीथे मी काय बोलणार" असे उडवाउडवीचे उत्तर नगराध्यक्षांनी दिले. Politics
काहीच होत नसल्याने बंडू क्षीरसागर यांनी येथील विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांना माहिती दिली असता नगरसेवक डोहे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते नगरपरिषदेत पोहोचून सविस्तर माहिती घेत संबंधित विभाग कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र अधिकारी नसल्याने कर्मचार्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता.शेवटी यासंदर्भात निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली आहे.अशाप्रकारे जर जनतेला त्रास देण्याचे प्रकार घडत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा नगरसेवक डोहे यांनी यावेळी दिला आहे. आता बंडू क्षीरसागर यांच्या करा विषयी काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.यावेळी निवेदन देताना नगरसेवक डोहे सह भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार, रोहन काकडे,अरविंद कोरे,शंकर आपूरकर, राकेश आरोरा,सुधाकर बोरीकर,सुयोग कोंगरे, बुरडकर, सुधाकर,शिंगरू,शर्माजी आदी भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.