News34 (गुरू गुरनुले)
मुल - तहसील कार्यालय मुल येथे सर्व आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचारी यांचा जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. महिला दिनानिमित्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कर्तव्यदक्ष तहसील डॉ. रवींद्र होळी, नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर, नायब तहसीलदार यशवंत पवार, ओंकार ठाकरे, यांच्या उपस्थितीत हा सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. आजच्या काळात महिला कोणत्याही कामात मागे नाही.पुरुषा प्रमाणे कर्तव्यदक्ष राहून सर्व सामान्य जनसेवा करीत असल्याचे डॉ. रवींद्र होळी यांनी सांगितले. कार्यक्रमाला कार्यालयातील सर्व महिला व पुरुष अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.