प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - बहुजन प्रतिपालक ज्यांनी स्वराज्य स्थापन केले छत्रपती राजे शिवाजी महाराज,पहिला महात्मा ज्योतिबा फुले,व स्त्रीशिक्षनाची जनक माई सावित्रीबाई फुले यांच्यावर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सभेत भाषण देतांना अपमानजनक बेताल वक्तव्य केल्याबद्दल अ. भा.महात्मा फुले समता परिषद व भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून दिनांक ७ मार्च २०२२ रोजी गांधीचौक मुल येथे जाहीर निषेध करण्यात आला.Insult to great men करणाऱ्या राज्यपालांना पदावरुन त्वरित खाली करा,राज्यपालाचा धिक्कार असो, अशा घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी भूमिपुत्र ब्रिगेडचे प्रमुख डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाशा गावतुरे,डॉ. कदम, महात्मा फुले समता परिषदेतर्फे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, महिला कार्याध्यक्ष सौ. शशिकला गावतुरे, गंगाधर कुनघाडकर यांनी Governer Bhagatsing Koshyari यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल परखड शब्दात भाष्य करुन जाहीरपणे निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज,शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या राज्यात संवैधानिक महत्वाच्या पदावर असलेल्या राज्यपाल यांना खाली केले नाही तर राज्यभर जनआंदोलनाचा मार्ग उभारू असा इशाराही म.फु. समता परिषद व भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे दिला आहे. निषेध केल्यानंतर भूमिपुत्र ब्रिगेड, म.फु. समता परिषदेच्या वतीने देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना मुलचे तहसीलदार यांच्या मार्फतीने लेखी निवेदन देण्यात आले. निषेध आंदोलनामध्ये अ. भा.म.फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, भूमिपुत्र ब्रिगेडचे प्रमुख डॉ. राजेश गावतुरे,डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. कदम, पं. स.माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, माजी नगरसेवक गुरु गुरनुले, प्राचार्य डॉ. के.एच.कऱ्हाडे, सावली तालुका अध्यक्ष न.प.सभापती नितेश रसे, प्रा.किसन वासाडे,प्रा.प्रभाकर धोटे, सहसचिव संजय चौधरी, हेमंत सुपनर, नामदेवराव गावतुरे, गंगाधर कुणघडकर, रोहित निकुरे, महेश जेंगठे, गोपी वाडगुरे,महेंद्र आत्राम, डॉ. समीर कदम, डॉ. दीपक जोगदंल, भास्कर खोब्रागडे, चक्रधर घोंगडे, दुषांत महाडोळे, साईनाथ लोनबले, देवराव ढवस, युवराज चावरे, प्रा.धंनजय चुदरी, भारत वाळके, गुणेश निकुरे, गजानन मंदाडे, दिलीप वाढई, सीमा लोनबले, अनिता नाक्षीने,अर्चना चावरे,तेजस्विनी नागोशे,रत्ना चौधरी, शुभांगी शेंडे, यामीना भेंडारे, कल्पना लेनगुरे, कल्पिता भडके, भरती कामडे, विद्या बुरडकर, तारा निकोडे, वनिता चन्ने, वसंत आवळे, बाबुराव सोनूले, बापूजी गुरनुले,विजय तावडे, प्रवीण लोनबले, नामदेव नाक्षीने, परशुराम शेंडे, ओमदेव मोहूर्ले विजय दुर्गे यांचेसह अनेक समता युवा सैनिक व भूमिपुत्र ब्रिगेड युवक कार्यकर्ते उपस्थित होते.या निषेध आंदोलनात विषमता निर्मूलन दल यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह पाठिंबा देत राज्यपालांच्या कृतीचा निषेध केला.