चंद्रपूर - 4 मार्चला शहरातील मध्यभागात आझाद बगीच्या जवळ कांग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांचेवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला होता.
या हल्ल्यात नागरकरांना गंभीर दुखापत झाली होती.
7 मार्चला नागरकर मारहाण प्रकरणातील तिन्ही आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली, मात्र मारहाणीचा गुन्हा असल्याने आरोपी युवकांना जामीन देण्यात आला.
Chandrapur police
मात्र आरोपींच्या बयान व मारहाणीचे कारण समजताच नागरकर यांनी आरोपी स्पष्टपणे खोटे बोलत असल्याचा आरोप केला.Main facilitator
कोहिनुर मैदानावर झालेल्या वादाचा जो उल्लेख आरोपीनी केला आहे ती तारीख त्यांनी सांगावी, कारण मी मागील काही वर्षात त्याठिकाणी गेलो नाही.
मला जी मारहाण करण्यात आली त्यामागे मोठे राजकीय षड्यंत्र आहे, जे आरोपी पकडल्या गेले त्यांचा मूळ सूत्रधार दुसरा आहे. Cmc chandrapur election
जर माझा वाद त्या युवकांशी झाला असता तर त्यांनी जास्तीत जास्त 1 आठवड्यात वचपा काढला असता, मात्र तसे काही झाले नाही. हा सर्व नियोजित कट आहे, मला राजकारणातून बाद करण्याचा डाव आहे.
काही महिन्यावर चंद्रपूर मनपाच्या निवडणुका होणार असून मी निवडणुकीत हरणार कसा यासाठी हे मारहाण प्रकरण रचण्यात आले.
निवडणुकीत जर कांग्रेसची सत्ता आली तर पदाची मारामारी होऊ नये, यासाठी हे सर्व षड्यंत्र रचण्यात आले.Political debates
मला गंभीर दुखापत असल्यावरही पोलिसांनी साधारण गुन्हे आरोपीवर दाखल केले, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंभोरे यांचेंजवळून तपास काढत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याजवळ द्यावा अशी मागणीही नंदू नागरकर यांनी News34 सोबत बोलताना केली. Political conspiracy
माझ्यावर जो अन्याय करण्यात आला त्यावर मी लवकर सर्वांचे पितळ उघडे पडणार, पण मी अश्या राजकीय वृत्तीपुढे झुकणार नाही असा इशारा नागरकर यांनी यावेळी दिला. chandrapur police sp