चंद्रपूर - 4 मार्चला सकाळी मॉर्निंग वॉक झाल्यानंतर कांग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांना रघुवंशी कॉम्प्लेक्स जवळ काही युवकांनी बॅट व stumps ने जबर मारहाण केली.
सदर घटनेचे शहरात चांगलेच पडसाद बघायला मिळाले, या मारहाणीत नागरकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले होते.
सदर घटनेनंतर खासदार, आमदार व पालकमंत्री यांनी पोलिसांची क्लास लावत आरोपींना अटक करण्याची मागणी केली, राजकीय व्यक्तीला मारहाण व जनप्रतिनिधींचा दबाव वाढल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. Chandrapur police
या प्रकरणी नागरकर यांनी दुचाकी चालकाला हटकले म्हणून मारहाण केली असे आधी सांगितले मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यावर वेगळेच कारण पुढे आले. Swearing
काही दिवसांपूर्वी कोहिनुर मैदानावर युवक cricket खेळत असताना नगरसेवक नागरकर यांना बॉल लागला, एका युवकाने तात्काळ नागरकर यांच्याजवळ जात, "अंकल सॉरी, गलतीसे आपको बॉल लग गया" असे म्हटले मात्र नागरकर यांनी युवकाचे काही न ऐकता शिवीगाळ करीत युवकाला 2 कानशिलात लावल्या. Beating players
मात्र त्यानंतर युवक काही न बोलता निघून गेला, मात्र मार खाल्ला म्हणून युवकाच्या मित्रांनी त्याला चिडवायला सुरुवात केली आणि यातून युवकाच्या मनात राग निर्माण झाला. Beating with Congress corporator
4 मार्चला सकाळच्या सुमारास तो युवक व त्याचे 2 सहकारी जात असताना आझाद उद्यानाजवळ आले होते, आणि वाटेत त्यांना नगरसेवक नागरकर दिसले, त्या युवकांनी काही न बघता नागरकर यांची वाट अडवीत अंकल उस दिन आपने मुझे क्यो मारे असे म्हटले त्यानंतर नागरकर यांनी पुन्हा शिवीगाळ करीत तू मुझे जाणता नही असे म्हणताच त्या युवकाने 2 झापडाचा बदला म्हणून Bat ने दोनदा प्रहार केले.
आणि त्यानंतर ते युवक तिथून निघून गेले.
या घटनेत विशेष म्हणजे त्या युवकांना नागरकर हे कांग्रेसचे नगरसेवक व राजकीय नेते आहे हे माहीत नव्हते. Political pressure
आणि ज्यावेळी नागरकर यांना मारहाण करण्यात आली त्यावेळी त्यांनी चेहऱ्यावर बुरखा घातला नव्हता.
2 दीवसाआधी शहर पोलिसांनी आरोपी युवकांचा शोध घेत मोहीम राबवली यात त्यांना यश आले. Attack on the corporator
आरोपी 26 वर्षीय सानू उर्फ आसिफ अली आशिक अली रा. BMT चौक रयतवारी कॉलरी, 20 वर्षीय राजेश उर्फ आर.के. अर्जुन केवट रा. रयतवारी कॉलरी, 22 वर्षीय सुमित दयाशंकर बहुरिया आनंदनगर महाकाली कॉलरी यांना 7 मार्चला अटक व जामिनावर सुटका करण्यात आली. सदर प्रकरणात स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहर पोलीस ठाणे गाठत प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली.
राजकीय व्यक्तीला मारहाण झाली म्हणून अनेक बोंबाबोंब शहरात झाली, त्यांना तात्काळ अटक करा, कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली मात्र जेव्हा प्रकरण उघडकीस आले त्यावेळी पोलिसांना समजले "खोदा पहाड निकला चुहा" अनेकांवर अन्याय होत असतो तेव्हा सुद्धा जनप्रतिनिधींनी असा पुढाकार घ्यायला हवा, राजकीय पुढाऱ्यावर हल्ला झाल्यावर नेमकं कारण काय याची माहिती जाणून न घेता बोंबाबोंब करणे योग्य नाही.