News34
राजुरा, 11 मार्च : मुख्य मार्गावरील गतिरोधक चालकांना दिसत नसल्याने या गतिरोधका जवळ अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. याची दखल घेत काल वंचित बहुजन आघाडी राजुरा तालुक्याच्या वतीने श्रमदान करण्यात आले. Unique initiative जिल्हा अध्यक्ष भूषण फूसे यांच्या पुढाकाराने जोगापूर गेट जवळील गतिरोधकाना पांढरा रंग मारण्यात आला. स्पष्ट दिसत नसल्याने वाहतुकीस अडचण ठरत असलेले गतिरोधक वाहन चालकांना दिसून त्यांना वाहनांवर आवर घालत वेगावर नियंत्रणास मदत होईल व होणाऱ्या अपघातांना पूर्णविराम लागेल.
Road safety
या गतिरोधकांमुळे खूप वाटसरू ना अपघाताला सामोरे जावे लागत होते. यामुळे या रस्त्या वरील रहदारी बघता रात्रीच्या वेळी चालकांना काहीच दिसत नसल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत होता. याची दखल घेत तिथे जाऊन गतिरोधकाला पांढरा रंग मारण्यात आला. Vanchit Bahujan Aghadi
तसेच त्यानंतर शिवाजी नगर येथील मुख्य मार्गावरील गतिरोधकाना रंग लावण्यात आले. जेणेकरून अपघात होऊ नये. तसेच चालकांना गतिरोधक दिसल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल व अपघात टळेल.
Traffic safety
यावेळी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भूषण फूसे, जिल्हा सचिव तथा राजुरा तालुका निरीक्षक रमेश लिंगमपल्लीवार, प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, जिल्हा सदस्य महेंद्रसिंग ठाकूर, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, तालुका महासचिव रविकिरण बावणे, तालुका उपाध्यक्ष सुभाष रामटेके, तालुका कार्याध्यक्ष सुभाष हजारे आदी उपस्थित राहून गतिरोधकांना पांढरा रंग लावण्यास सहकार्य केले.
