News34
चंद्रपूर - राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला, सर्व सामान्य जनतेला केंद्र स्थानी ठेवत सर्वच क्षेत्राला भरीव निधी देत समनव्य साधण्याचा सरकारने प्रयत्न करीत, आरोग्यासाठी चांगल्या उपाययोजना या अर्थसंकल्पात पुढे आल्या आहे. Maharashtra budgets 2022
नियमित अर्थसंकल्पाव्यतिरिक्त राज्यातील आरोग्य सुविधांवर करणार 3 हजार 111 कोटींचा निधी खर्च केला जाईल. आरोग्य संस्थ्यांच्या श्रेणीवर्धन बांधकामाकरिता मागील वर्षी 7 हजार 500 कोटींचा प्रकल्प जाहीर केला होता. या प्रकल्पासाठी हुडकोकडून 3 हजार 948 कोटींचं कर्ज घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 22-23 मध्ये या प्रकल्पाला हुडकोकडून 2 हजार कोटी आणि 15 व्या वित्त आयोगाकडून 1 हजार 313 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. Ajit pawar
ग्रामीण भागातील रुग्णालयातील रुगणांना शस्त्रक्रियेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथेक्रिप्सी उपचार उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या तीन वर्षात ही उपचार पद्धती सुरु करण्याचे प्रस्तावित असून त्याकरिता 17 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
Health budget
विदर्भासाठीच्या पाच महत्त्वाच्या घोषणा
- गोसेखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
- देशी गायींची पैदास वाढावी यासाठी विदर्भात तीन मोबाईल प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार
- अमरावती आणि गडचिरोली येथे विमानतळाची घोषणाही अजित पवार यांनी केली
- यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, भंडारा येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येईल
- अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी समूह क्षमता वाढ करण्याचा निर्णय
