News34
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - चंद्रपूर-नागपूर मार्गावर वसलेल्या सिंदेवाही शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो. सिंदेवाही शहरातील राष्ट्रीय महामार्गावर एकही गतिरोधक न असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून या मार्गावर गतिरोधक देण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. Traffic safety
सिंदेवाही तालुक्याचे मुख्यालय असून सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील नागरिक सामानाची विक्री व खरेदी करण्याकरिता या ठिकाणी येतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर या महामार्गावर महाविद्यालय, शाळा, ग्रामीण रुग्णालय, खाजगी दवाखाने आहेत. Speed breaker
शहरात बाजार चौक, बसस्थानक परिसर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असून नागरिकांमुळे चौक गजबजलेले असतात. गतिरोधक नसल्याने भरधाव येणाऱ्या वाहनावर नियंत्रण मिळविणे कठीण होत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर या मार्गाने रहदारीचे प्रमाण जास्त असून शाळेच्या सुट्टी मध्ये विनापरवाना धारक minor मुले दुचाकी भरधाव वेगाने व अतिरिक्त मुले बसवून चालवित असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून या रस्त्याने नेहमी छोटे-मोठे कीळकोळ अपघात होत असतात. त्यामुळे या शाळेत जाण्याच्या मार्गावर तसेच राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक देण्याची मागणी होत आहे. Road speed breaker
सिंदेवाही हे शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होत आहे. चौका- चौकात गतिरोधकाची निर्मिती करावी अशी शहरातील नागरीकाची व शाळेत जाण्याऱ्या विद्यार्थी व पालकांची मागणी होत आहे.
