News34
चंद्रपूर - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता अनेक महत्वपूर्ण रेल्वे गाड्या सुरु केल्या, सुपरफास्ट गाड्यांचे थांबे मंजूर करून घेतले. Rail transport
बल्लारशाह पिटलाईन हे यांच्या दूरदृष्टीचे व अथक परिश्रमाचे फलित आहे. हे काम पूर्ण झाल्याने बल्लारशाह वरून थेट पुणे, मुंबई व अन्यत्र रेल्वे गाड्या सुरु होणार आहेत. Ballarshah-mumbai train
येत्या १५ एप्रिल पासून बल्लारशाह - मुंबई गाडी सुरु होत असून हेसुद्धा त्यांच्या सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांचेच यश आहे. Ballarshah - pune थेट गाडी लवकरच आठवड्यातून ३ दिवस धावणार. रेल्वे विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता अथक प्रयत्नातून त्यांचा सदैव पाठपुरावा सुरु असल्याने जिह्यातील रेल्वे प्रवाशांना यथावकाश अनेक सोयी उपलब्ध होणार आहेत. Railway passengers
रेल्वे सुविधेकरिता सदैव तत्पर असणारे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
