News34
वरोरा - वरोरा शहरालगत असलेल्या बोर्डा (आराध्य लॉनच्या मागे ) येथील रहिवासी व बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनींने गळफास घेऊन आत्महत्या केली, सदर घटना दि,१०/०३/२०२२ रोजी सायंकाळी घडली.
12th exam
12th exam
हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथील १२ व्या वर्गात शिकत असलेली अनन्या चंद्रशेखर चिमुरकर (१८) हिने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अनन्याने नुकतेच १२ बोर्डाच्या परीक्षेचे दोन पेपर दिले असता, उर्वरित चार पेपर बाकी होते, घटनेच्या दिवशी भाऊ कामावर गेला होता, व तिची आई घरी आपल्या कामात व्यस्त असतांना, संधीचा फायदा घेत तिने गळफास लावला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. Suicide and Youth
ती सातत्याने आजारी ही राहत असल्याची माहिती मिळाली असून वडील चंद्रशेखर चिमुरकर यांच्या पहिल्या मुलीचा काही वर्षा अगोदर चंद्रपूर येथे स्विमिंग पुलामध्ये मृत्यू झाला होता, यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती, अनन्या ही दत्तक मुलगी असल्याचे समजते, कुठल्या कारणामुळे गळफास लावला हे अद्याप कळले नसून वरोरा पोलीस अधिक तपास करीत आहेत. Preventing Youth Suicide
