News34 chandrapur
राजुरा : जिवती या अतिदुर्गम आदिवासीबहुल तालुक्यातील नगराळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मारोतीगुडा येथील आदिवासी आदीम जमातीतील कोलाम या मागास समाजातील नानाजी मडावी यांचा मुलगा जिवती तालुक्यातील कोलाम समाजात पहिला बी. ई. अभियंता बनण्याचा मान मिळवीला आहे. नुकताच त्यांचा एक कार्यक्रमात माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सत्कार केला आहे.
Kolam tribe
निमित्य होते ते नानाजी मडावी यांचे चिरंजीव माणिक व दमपूरमौदा येथील कर्णू कोडापे यांची सुकन्या वैष्णवी यांचा शुभविवाहाचा, आदिवासी संस्कृती नुसार मोठ्या थाटामाटात देखण्या अश्या विवाह सोहळ्याला माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित झाले होते. त्यावेळी कोलाम समाजात मडावी परिवाराचा पहिला अभियंता झाल्याची माहिती मिळाली. Kolam people
त्यावेळी छोटेखानी कार्यक्रमात नानाजी मडावी यांच्या मुलाचा सत्कार करण्यात आला यावेळी, राजुरा येथील अनिल हस्तक उपस्थित होते, वर-वधु परिवाराकडून माजी आमदार निमकर यांचा सत्कार करण्यात आला. जिवती तालुक्यातील आदिम जमातीमधील कोलाम या अतिमागास कुटुंबातील नानाजी मडावी यांचा मुलगा पहिला बी. ई. अभियंता होण्याचा मान पटकाविल्याबद्दल समाज बांधव व परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. Inaccessible