ब्रह्मपुरी - 7 वर्षाच्या नातीनवर अत्याचार करणाऱ्या 67 वर्षीय आरोपी आजोबाला न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
पीडित 7 वर्षीय मुलीची आई मरण पावल्याने ती आजी, आत्या व आजोबासोबत ब्रह्मपुरी तालुक्यातील कहाली या गावी राहत होती. पीडित मुलगी पहिल्या वर्गात शिकते.
4 फेब्रुवारी 2020 ला रात्रौ 67 वर्षीय आजोबा सुधाकर पिल्लारे यांनी पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
सदर घटनेची पोलीस तक्रार पीडितेने पोलीस पाटील यांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारीला पोलीस स्टेशनमध्ये अत्याचाराची तक्रार नोंदवली.
धक्कादायक बाब म्हणजे विकृत आजोबा मागील 2 महिन्यापासून पीडितेवर अत्याचार करीत होता.
पोलीस तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तात्काळ आरोपी पिल्लारे ला अटक करीत कलम 376(1), (ए), 376 (2), (एफ) (एन), 376 (एबी), भांदवी सहकलम 4, 6, 10 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. Sexual harassment
गुन्ह्याचा तपास सपोनि पूनम पाटील यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावे पोउपनी कांता रेजितवार्ड यांच्या साहाय्याने न्यायालयात सादर केले.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने साक्षीदार तपासत योग्य पुराव्याच्या आधारे आरोपी सुधाकर पिल्लारे कलम 10 पोक्सो अंतर्गत 5 वर्षाची शिक्षा व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास शिक्षेत पुन्हा 6 महिन्याची वाढ अशी शिक्षा ठोठावली. 5 years imprisonment
कलम 376(1), (ए), 376 (2), (एफ) (एन), 376 (एबी), भांदवी सहकलम 4, 6 पोक्सो मध्ये आरोपीला निर्दोष ठरविण्यात आले. Pocso act
सदर शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीक्षित यांनी ठोठावली तर सदर प्रकरणी सरकारतर्फे ऍड. देवेंद्र महाजन व सहा.सरकारी अभियोक्ता स्वाती देशपांडे आणि कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार रामदास कोरे ब्रह्मपुरी यांनी काम बघितले.
