News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - देवनील शिक्षण प्रसारक मंडळ मूळ द्वारा संचालित Devanil School of Nursing मुल (आकापूर) येथे २७ मार्च २०२२ रोजी ए. एन.एम.व जी एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या आगमन प्रसंगी त्याचे स्वागत व शपथविधी करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार देवराव भांडेकर यांचेहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार, सत्कारमूर्ती डॉ कुबेर कोतपल्लीवार, विशेष अतिथी डॉ. अशोक भूकते, डॉ. अभिलाषा गावतुरे, प्रमुख अतिथी माजी आमदार तथा विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवराव भांडेकर, संचालक दिवाकर भांडेकर, देवनील टेकडी शाळेचे मुख्याध्यापक राजेश सावरकर, देवनील स्कुल आफ नर्सिंगचे प्राचार्या भावना टेकाम, रुपाली मुंडे, प्रज्ञा चुणारकर, कोमल चंद्रगिरे, रिंकू गायकवाड, व श्रीकांत आत्राम, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ए एन.एम. व जी.एन.एम.प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या हाती मेणबत्ती देऊन शपथविधी कार्यक्रम घेण्यात आला. तसेच Nursing College कालेजला भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. अशोक वासलवार, डॉ. कुबेर कोतपल्लीवार, यांनी नर्स हीच रुग्णालयाचा खरा आधारस्तंभ असून नर्सेसने संयम, संतुलन ठेऊन रुग्णांना सेवा द्यावी असे अमूल्य मार्गदर्शन केले. तर डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी विद्यर्थिनींनी आधुनिक पद्धतेचे ज्ञान वाढवावे असे आव्हान केले. तर डॉ. अशोक भुक्ते यांनी नर्सेसनी प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करावी असे मार्गदर्शन केले. तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार देवराव भांडेकर यांनी रुग्ण सेवाच जीवनात महत्वाची सेवा आहे याचा आदर ठेऊन विद्यार्थीनिनी खंबीर राहून प्रशिक्षण पूर्ण करावे व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या भावना टेकाम यांनी केल्या संचालन अमन,चेतना,पूजा, यशोदा यांनी केले तर आभार अंकिता कुंभारे या विद्यार्थिनीने मानले.