News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर प्रभाग क्रं.1 येथील रहिवासी "किशोर कुमार वामन आत्राम" या अपंग युवकाने नुकतेच केंद्रीय पात्रता परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. घरची परिस्थिती हलाखीची त्यावर अपंगत्व,अशा कठीण परिस्थितीवर मात करून किशोर यांनी हे यश प्राप्त केले आहे.
काही वर्षापूर्वी आईचे निधन झाले, त्यातच अभ्यासक्रम,असे अनेक प्रसंग त्याच्या समोर आले. Disability Welfare Fund अंतर्गत येणाऱ्या पैशातून त्यांनी पुस्तके घेऊन अभ्यास केला. काही मित्रांच्या सहकार्यातून किशोर यांनी येथील शरद पवार कॉलेज ग्रंथालयात अभ्यासक्रमाला सुरूवात केली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करून तो आपला गुजारा करायचा. आईच्या निधनानंतर वृद्ध वडीलाचा सांभाळ, स्वयंपाक व घराची इतर कामे आटपून तो ग्रंथालयात जाऊन अभ्यास करत होता. दरम्यान त्यांनी "Central Eligibility Test" मध्ये भाग घेऊन यामध्ये घवघवीत यश संपादन केले. हलाकी,अपगंत्व अशा कठीण परिस्थितीवर मात करून यश प्राप्त केल्याने किशोरचे सर्वत्र कौतुक होत असून जिद्द आणि चिकाटी असल्यास यश नक्की मिळवता येते हे किशोरने सिद्ध करून दाखविले आहे.