चंद्रपूर - तेलंगाणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या आंतरराज्यीय 103 किलो गांजा सहित 2 आरोपीना अटक करीत तब्बल 41 लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला आहे. Lcb chandrapur
गांजा तस्कर 2 चारचाकी वाहनाने गांजा ची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ पथक तयार करीत चीचपल्ली येथील शेरे पंजाब ढाब्याजवळ पोलिसांनी पाळत ठेवली.
काही वेळात चारचाकी वाहन Honda city AP 9 BE 1122, Swift maruti AP10 AB 2769 आले असता
पोलिसांनी चौकशी केली असता त्या वाहनात 51 पाकिटांमध्ये 103 किलो 839 ग्राम किंमत 31 लाख 15 हजार 170 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. Cannabis smuggling
सदर तस्करीत आरोपी 50 वर्षीय शिक्षक श्रीनिवास नर्सय्या मचेडी व 29 वर्षीय शंकर बलय्या घंटा रा. सुभाष नगर मथनी, करीमनगर तेलंगाणा.
या गुन्ह्यात एकूण मुद्देमाल वाहनासाहित 41 लाख 15 हजार 170 रुपये जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपींवर कलम 8 क, 20 ब, II क, एनडीपीसी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी संदीप कापडे, सचिन गदादे, संजय आतकुलवार, प्रकाश बलकी, सतीश बगमारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
