चंद्रपूर - शहरातील मध्यभागी असलेले मौलाना अबुल कलाम आझाद बगीच्याच्या उदघाटन कार्यक्रमात जनप्रतिनिधींना स्थान न दिल्याने कार्यक्रमस्थळी मानापमान नाट्य झाल्याने एकच गोंधळ उडाला.
26 मार्चला सायंकाळी जनप्रतिनिधींची राजकीय दंगल बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली, आमदार सुधीर मुनगंटीवार व खासदार बाळू धानोरकर कार्यक्रम स्थळी आधी उपस्थित झाले मात्र आमदार किशोर जोरगेवार कार्यक्रम स्थळी पोहचताच चंद्रपूर मनपा प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. Mla kishor jorgewar got angry
पालिकेचा एकही शासकीय अधिकारी आमदार जोरगेवार यांना घेण्यासाठी आला नाही, ही बाब स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांना समजताच ते आमदार जोरगेवार यांना घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता.
हे ही वाचा - चंद्रपूरचे आमदार म्हणतात "मै झुकेगा नही"
अखेर महापौर राखी कंचर्लावार यांनी मध्यस्ती केल्यावर आमदार जोरगेवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले. Violation of courtesy
आझाद बगीच्याची पाहणी करताना खासदार धानोरकर, आमदार मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांच्या समर्थकांनी जोरदार नारेबाजी केली.
यावेळी नागरिकांसह पोलिसांची मोठ्या संख्येत कार्यक्रमात उपस्थिती होती.
