News34
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर मार्गावर अनेक अपघात प्रवण स्थळ निर्माण झाले आहेत. याबाबतची माहिती वाहनचालकाला मिळावी यासाठी अपघात प्रवण स्थळी गतीरोधक तयार करुन फलके लावावी, अशी मागणी जनविकास सेनेच्या महिला आघाडीने केली आहे. Road safety
चंद्रपूर-नागपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. येथील जुना वरोरा नाका चौकात भरधाव वाहनांमुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. अपघातात अनेकांचा जीव गेला तर काहींना अपंगत्व आले. दिवसेंदिवस या मार्गावर Accident prone place वाढत आहेत. नागपूर मार्गावरील एमडीआर मॉलसमोर, बापट नगरकडे जाणाऱ्या वळणाजवळ, नानाजी नगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाकडे जाणाऱ्या वळणावर भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे अशा सर्व अपघात प्रवणस्थळावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी जनविकास सेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा बोबडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कुंभे यांना दिलेल्या निवेदनातून केली. Speed breaker यावेळी जनविकास सेना महिला आघाडीच्या कविता अवथनकर, प्रीती बैरम-पोटदुखे, मेघा मगरे, माया बोढे, अरुणा महातळे, रमा देशमुख, पायल मगरे आदी उपस्थित होते.
