चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने चंद्रपूर शहरातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला गुरुवार दिनांक 17 मार्च पासून प्रारंभ होत आहे.
शहरातील एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलसमोरील केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर सकाळी 10 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे. Vaccination was started लाभार्थ्यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. corbevax vaccine news
पुढील काही दिवसात शालेय परीक्षा होणार असून, त्यापूर्वीच आपल्या बालकांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही लस घ्यावी, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांनी केले आहे. Chandrapur municipal corporation