News34 Chandrapur
चंद्रपूर - जागतिक महिला दिनी चंद्रपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करीत अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी महिला दिन उत्साहात साजरा केला.आयोजित कार्यक्रमात शिवसेनेच्या सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे, जयश्री कापसे, डॉ. स्नेहल बिलबाने, मंगला घागी पोलीस, सफाई कामगार कांताबाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चूल आणि मुल या आयुष्याच्या चक्रात महिला आपले संपूर्ण आयुष्य गुंतविते मात्र स्वतःसाठी काही सुखाचे क्षण काढायला त्यांना वेळ मिळत नाही.
यासाठी मनस्वी गिर्हे यांनी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले, या कार्यक्रमात अनेक महिलांनी विविध खेळांचा आनंद घेतला, ज्यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा या खेळांचा समावेश होता.
सायंकाळी खाऊ गल्लीने महिलांना विविध पदार्थांची चव चाखायला मिळाली.
कार्यक्रमात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक व प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. Shivsena
यावेळी आयोजिका मनस्वी गिर्हे यांनी मार्गदर्शन करतांना सध्याचं व पूर्वीच्या आयुष्यात फार मोठा बदल घडलेला आहे, आज महिलांना या बदलामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, सदर समस्यांना सामोरे जात असताना आपण स्वतःसाठी कधी वेळ काढू शकत नाही मात्र आपला हक्काच्या महिला दिवसाला स्पर्धेच्या माध्यमातून आपण आनंदाने सहभाग घेऊ शकलो. Woman's day
हा आनंद आपण आपल्या आयुष्यात असाच सदैव असू द्या, जेणेकरून किती मोठी समस्या आपल्या पुढे उभी राहली त्यावेळी आपण ठामपणे त्या समस्येचा सामना करू शकतो.
आयोजित कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेत उपस्थिती दर्शविली.